शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
शनिवार दिनांक १० फेब्रूवारी २०२४
जयंतराव कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन..!!
राहुरी : राहुरी येथील स्टेट बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी तसेच ऑल इंडिया स्टेट बँक कर्मचारी युनियनचे माजी सचिव जयंतराव वसंतराव कुलकर्णी वय ६८ यांचे अल्पशा आजाराने पुणे उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले.
त्यांचे पश्चात चुलते, बंधू ,पत्नी एक मुलगा एक मुलगी असा मोठा परिवार आहे. ते प्रमोद दत्तात्रय कुलकर्णी यांचे ते पुतणे तर अमित कुलकर्णी यांचे ते वडील होते. प्रशांत व विश्वजित कुलकर्णी यांचे बंधू होते.
काल सायंकाळी शोकाकुल वातावरणात राहुरी येथील गणपती घाट स्मशानभूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

