shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुख्यमंत्री मा. मनोहर जोशी यांचे निधन दुःखदायक..!


एकनिष्ठ शिवसैनिक, नेत्याचा म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक, मुंबई चे महापौर, मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष असे पदे भुषवणारे मनोहर जोशी सर  

निळवंडे धरणाचे निर्माते...

उत्तर नगर जिल्ह्यात दुष्काळी भागाला वरदान ठरणारे व अनेक वर्ष रखडलेला प्रकल्प निळवंडे धरणाचे १९९६ साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कार्यकाळात कामाला प्रत्यक्षात  सुरवात झाली असल्याने निळवंडे धरणाचे खरे निर्माते मनोहर जोशी आहेत. तत्कालीन शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराजे धुमाळ, भाजपा तालुकाध्यक्ष नंदकुमार विसाळ, सिताराम भांगरे,  जालिंदर वाकचौरे व आम्ही धरणाचे भूमिपूजन केले. 

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे निर्माते

 अखिल भारतीय मराठा महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष कै. किसनराव वरखिंडे, सरचिटणीस कै. सुरेश माने,  कै.अप्पासाहेब पवार, राजेंद्र कोंढरे यांच्या मागणी वरून मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकासाठी महामंडळ स्थापन करून कै. अण्णासाहेब पाटील यांचे नावे महामंडळ करण्याची मागणीला संमती दर्शवून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी सन १९९८ मध्ये हे महामंडळ स्थापन केले.

संसद भवनात छत्रपतींचा अश्वरूढ पुतळा व विधानभवनात राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा

मनोहर जोशी लोकसभा अध्यक्ष असताना तत्कालीन पंतप्रधान मा अटलबिहारी वाजपेयी यांनी जाणता राजा छत्रपती शिवराय यांचा संसदेच्या प्रांगणात अस्वरूढ पुतळा उभारला तर मुख्यमंत्री असताना विधनभवनात राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा लावली
असा मराठा समाजाला मदत करणारा मुख्यमंत्री हरपला....

श्री. भाऊसाहेब वाकचौरे पाटील
अखिल भारतीय  मराठा महासंघ, उत्तर नगर जिल्हा
close