shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

४ फेब्रूवारी जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने डॉ. रवींद्र कुटे


जागतिक पातळीवर कर्करोग हा  दोन नंबरचा जीवघेणा आजार  आहे .दरवर्षी  साधारणतहा दहा  दसलक्ष मृत्यू कर्करोगामुळे  होतात,म्हनजेच  26300  मृत्यू रोज व हा आकड़ा 2030 पर्यन्त 13 दसलक्ष पोहचू शकतो . दरवर्षी साधारणतहा 20 दसलक्ष  कर्करोगाची नविन लागण होते . साधारणपणे 10 % कर्करोग जनुकांच्या बदलामुळे तर  27 % कर्करोग हे टाळता येण्या सारख्या  व्यसनामुळे म्हणजेच तंबाखू , दारू यामुळे होतात .भारतात  याचे प्रमाण इतर देशापेक्षा जास्त  आहे .
      राष्ट्रीय कर्करोग नोंदणी  संख्येवारी नुसार 2022 साली  भारतात 14,61,427 कर्करोग  रुग्णांचे निदान झाले म्हणजे  100 रुग्ण प्रति लाखामागे व  संख्याशास्रा नुसार  2025 मधे  यात 12.8 % वाढ  होऊन  रुग्णसंख्या 1.57 दसलक्ष  होऊ  शकते .भारतामधे प्रतयेक 9 वी  व्यक्ति आयुष्यभरात केव्हाही  कर्करोग ग्रस्त  होऊ  शकते .

      पुरुषामधे  फुफुँसाचा  कर्करोग तर स्रियामधे स्तनाचा  कर्करोग सर्वात जास्त  आढळतात .हे रुग्ण बऱ्याचदा  पुढच्या टप्प्यात आजार गेल्यावर  निदर्शनास येतात . 57 % स्तनाचे  कर्करोग रुग्ण , 60% गर्भाशयाच्या मुखाचे कर्करोग  रुग्ण  ,मान व डोक्याचा  कर्करोगाचे  रुग्ण  50 % हे  बऱ्याच पुढे गेलेल्या अवस्थेत  दवाखाण्यात येतात . हे  सगळी  आकडेवारी बघता UICC या  कर्करोगावर  काम  करणाऱ्या  संस्थेने 2000 सालापासून  जागतिक कर्करोग दिवस  पाळण्याचे संकेत दिले  आहेत .यामुळे  जागृती , शैक्षणिक जाणिव , शासकिय व  अशासकीय पातळीवर दखल  घेऊन लक्षावधी लोकांचे प्राण  लवकर निदान व उपचार करुन  वाचवता येतील व टाळता येतील यासाठी प्रयत्नशील आहे . UICC संस्थेने  Close the Care Gap  अर्थात काळज़ी अंतर बंद करा  हा नारा पुकारून काम सुरु ठेवले  आहे व 2024 हे वर्ष तिसरे व  अंतिम वर्ष असणार आहे .
इंडियन  मेडिकल एसोसिएशन  व जागतिक आरोग्य  संघटना  यांनी  संयुक्त पणे 2030 पर्यन्त  गर्भाशय कर्करोग दूर करा  यासाठी लढा पुकारला  आहे . आए एम ए संघटने तर्फे प्रतिबन्ध , निदान व उपचार  यावर भरीव काम सुरु केले  आहे . 
      भारतात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण हे स्रियात व  पुरुषात असणाऱ्या  कर्करोगत  सर्वात जास्त आहे .साधारणतहा  13.5%. यासाठी  छाननी  शिबिरे , जाणीव जागृती  व  लवकर निदान अत्यंत महत्वाचे  आहे .
   आय एम  ए  या  संघटनेने  कर्करोगाबाबतची जोखिम कमी  करण्यासाठी खालील गोष्टी  दैनदिन आचरणात आणाव्यात  अशा सुचना केल्या आहेत कारण  कर्करोग हा  दैनदिन सवयी , राहणीमान व निसर्गाशी नाते  तोडल्या गोष्टीमुळे होणारा  आजार आहे .
खालील गोष्टी आचरण्यात  अनाव्यात :
1. आरोग्यदायी आहार 
2. . हालचाल व चपळता 
3. ⁠तम्बाखू व दारू पासून मुक्ती 
4. ⁠एस्बेस्टॉस ,जंतु नाशके आदि  प्रदुषण करणाऱ्या घटकापासून  अलिप्त 
5. ⁠एच् पी वी लसीकरण 
6. ⁠तृणधान्ये , पालेभाज्या , फळे  व  बियांयुक्त आहार 
7. ⁠प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ , लाल मांस , साखर व गोडी  वाढवणाऱ्या पदार्थापासून दूर 
8. ⁠कर्करोगाबाबतच्या प्राथमिक  लक्षणांची माहिती व जागृती 
आए एम ए संघटनेद्वारे सतत  जागृती शिबिरे , माहिती पत्रके , चर्चासत्रे ,वर्तमान पत्रातून लेख  , आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण  या गोष्टीद्वारे सातत्याने प्रबोधन  चालू  आहे .
"चला तर कर्करोगमुक्त भारत  स्वप्न साकारु  या ".
*डॉ.रवींद्र कुटे*
मा.अध्यक्ष : आय एम ए. महाराष्ट्र 
*संकलन :*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
close