shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवजयंती निमित्त* *सुर्यनमस्कारातून* *छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना ..


 *शिवजयंती निमित्त* *सुर्यनमस्कारातून* *छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना ..
 
इंदापूर:- पतंजलि योग समिती इंदापूर यांचे वतीने नगरपालिके जवळील मराठी शाळेमध्ये सुरू असलेल्या योग शिबिराचे दुसर्‍या दिवशी शिवजयंती महोत्सवनिमित्त पहाटेच्या योगवर्गामध्ये  सुर्यनमस्कारातुन छत्रपती शिवाजी महाराज आणि मालोजीराजेंना मानवंदना देण्यात आली...यावेळी  शिवभक्तांनी घोषणा देत शिवाजी महाराजांचा जयजयकार केला... 
कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन  आणि शिवाजी महाराज आणि मालोजीराजेंच्या प्रतिमाचे पुजन इंदापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक शेखर पाटील,शिवसेना शहरप्रमुख महादेव सोमवंशी,अर्बन बॅकेचे संचालक दादासाहेब पिसे  सामाजीक कार्यकर्ते हमीदभाई आत्तार आणि महिला योगशिक्षिकांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवव्याख्याते समाधान भोरकडे यांनी मार्गदर्शनामध्ये आजच्या युवकांनी शिवचरित्राचा अभ्यास का करावा? शिवाजी महाराजांचे नेतृत्वगुण समर्पक भाषेत सांगितले..
 कार्यक्रमा यशस्वी करण्यासाठी बिभिषण खबाले,  शंकर काशीद,रविंद्र परबत,देवराव मते,किसन पवार सुनिल कांबळे,चंद्रकांत देवकर,सचिन पवार,रामेश्वर साठे,,पांडुरंग झोळ,बाजीराव शिंदे,राजेंद्र चव्हाण,भालचंद्र भोसले,आण्णासाहेब चोपडे स्वप्निल धस लखन परदेशी यांनी परिश्रम घेतले.
close