shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दुर्गम पाचनई येथील विद्यार्थ्यांचा मिठाचा शोध च्या लेखिकेशी व्हरचुअल संवाद


श्रीरामपूर प्रतिनिधी:
अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचनई या शाळेतील विद्यार्थ्यांनी इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील भाषा विषयातील मिठाचा शोध या पाठाच्या लेखिका अंजली अत्रे यांच्याशी  व्हिडिओ  कॉलद्वारे संवाद साधला.

    लेखिकेने पाठ्यपुस्तकातील मिठाचा शोध याविषयीत विद्यार्थ्यांना आपलेसे केले, त्याचबरोबर आदिमानव आणि त्यांचे संबंध, खनिज मीठ म्हणजे काय, सैंधव मीठ,तसेच मीठ होण्याची प्रक्रिया याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना माहिती सांगितली.

वास्तविक विडिओद्वारे बोलायचे म्हणजे शाळेत आंतरजाल ची सुविधा असणे आवश्यक मात्र येथील शाळेत अशी कोणतीही सुविधा नसताना कृतीशील शिक्षक किरण बांडे यांनी विद्यार्थ्यांना बसच्या सहाय्याने सहा किलोमीटर अंतरावर येवून आंतरजाल ची सुविधा असलेल्या वाघ्या  या ठिकाणी येवून लेखिका अंजली अत्रे यांचेशी संवाद साधला. यावेळी मिठाचा शोध हा पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळात धडा कसा समाविष्ट झाला याबद्दल त्यांनी अनेक किस्से सांगून  मासिक ते पाठ्यपुस्तक मंडळ  असा मिठाचा शोध  चा प्रवास लेखिकेने विद्यार्थ्यांना ऐकवला.लेखिकेने विद्यार्थ्यांच्या उत्कंठा,उत्साहीपणा आणि चुनचूनचणीतपणा याविषयी कौतुक करत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत पाठाचे अधिक संवादीकरण केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून माहिती करून घेतली. यावर विद्यार्थ्यांनी कंदमुळे,वन्य प्राणी जसे की  पाठातील हरीण जाती सदृश्य भेकर, सांबर या वन्य प्राण्यांची माहिती विद्यार्थ्यांनी लेखिकेला सांगितली तर लेखनाबरोबर साकारलेली वारली चित्रकला ही संस्कृती आदिवासींच्या अगदी जीवनाशी, निसर्गाशी एकनिष्ठ घट्टपने कशी चिकटून आहे हे  शिक्षक किरण बांडे यांनी महितीतून स्पष्ट केले. अनुजा सोमनाथ भारमल,वंश युवराज बादड,साहिल गोरक्षनाथ बादड व श्रृती सोमनाथ भारमल आदि विद्यार्थ्यानी चर्चेत सहभाग घेतला. 
शेवटी लेखिकेने विद्यार्थ्यांना जीवनात मोठे व्हायचे असेल तर अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही असे सांगितले.

या उपक्रमाचे विशेष म्हणजे ही शाळा अतिशय दुर्गम भागात असून इथे कोणत्याही प्रकारचे नेटवर्क नाही तरीही किरण बांडे यांनी केलेल्या या उपक्रमाचे कौतुक तालुक्याचे गटशिक्षणअधिकारी अभयकुमार वाव्हळ,शिक्षण विस्तार अधिकारी बाळासाहेब दोरगे  आणि केंद्र प्रमुख श्री शकील बागवान यांनी  केले आहे.



किरण बांडे हे कृतीशील शिक्षक आहेत.त्यांचा वाचनाचा व्यासंग मोठा आहे.विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना सातत्याने  नवनवीन देण्याचा ध्यास ते घेतात.शाळेतील विद्यार्थी प्रय्त्नवादी आहेत.विद्यार्थ्यांना असे प्रसंग उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढतो,त्यातून उपस्थिती सातत्य टिकून राहते.
- अभयकुमार वाव्हळ,गट शिक्षणाधिकारी,पं.स.अकोले

पत्रकार लियाकतखान पठाण- संगमनेर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close