shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगाना सायकल वाटप - ससाणे

*माजी मंत्री. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगाना सायकल वाटप - ससाणे

 श्रीरामपूर प्रतिनिधी:
माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात ग्रामीण विकासाचा ध्यास घेऊन, गोरगरिबांच्या कल्याणसाठी  अविश्रांतपणे कार्य करणारे नेतृत्व असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले. स्व.जयंतराव ससाणे मित्र मंडळ व श्रीरामपूर शहर काँग्रेस, तुळजा फौंडेशन, साई
सोशल फौंडेशन च्या वतीने आयोजित आ.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग व्यक्तींना सायकल वाटप कार्यक्रम प्रसंगी ससाणे बोलत होते. 
ससाणे पुढे म्हणाले की काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीत आ. बाळासाहेब थोरात यांचे मोठे योगदान असून,काँग्रेसची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.


माजी नगराध्यक्ष संजय फंड म्हणाले की माजी महसुलमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी महसूल विभागात अनेक क्रांतिकारी बदल घडून आणले . महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस हेमंत ओगले म्हणाले की,मा.ना. बाळासाहेब थोरात हे  सुसंस्कृत नेतृत्व असून , सर्वसामान्यांचे आधारवड आहेत . मा नगरसेवक मुजफ्फर शेख म्हणाले की ,आ.बाळासाहेब थोरात यांनी १९८५ पासून संगमनेर तालुक्याचे विक्रमी मताधिक्याने प्रतिनिधित्व करत असून.राज्यात कृषी, महसूल, शालेय शिक्षण यासारखे महत्त्वाचे विभाग कार्यक्षमपणे सांभाळले आहेत. यावेळी दिव्यांग व्यक्तींना मोफत सायकलचे वाटप करण्यात आले . उपस्थित मान्यवरांनी आ. बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, जि. प. चे माजी सभापती बाबासाहेब दिघे, कृषी उत्पन्न  बाजार समितीचे संचालक खंडेराव सदाफळ, राजेंद्र पाऊलबुद्धे, विलास दाभाडे, राजू चक्रनारायण, मा. नगरसेवक दिलीप नागरे, रितेश रोटे, दिलीप सानप, आशिष धनवटे, सुहास परदेशी, प्रवीण नवले, भारत भवार, कॉंग्रेस सेवा दल चे अहमदनगर जिल्हा मुख्य समन्वयक मास्टर सरवरअली सय्यद, रावसाहेब आल्हाट, सुरेश ठुबे,बाळासाहेब पवार, मिथुन शेळके, अरुण लबडे, रघुनाथ उघडे, लक्ष्मण उघडे, जावेद शेख, अमोल नाईक, प्रशांत राऊत, सनी मंडलिक, रियाजखान पठाण, नजीर शेख, सुनील साबळे, सरबजीतसिंग चूग, निलेश भालेराव, युनूस पटेल, बाबा वायदंडे, लक्ष्मण शिंदे, डॉ.अनिकेत चव्हाण, संजय गोसावी, योगेश गायकवाड, गोपाल भोसले, विशाल साळवे, राजेश जोंधळे, सागर दुपाटी, श्रेयस रोटे, जियान पठाण, कल्पेश पाटणी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*पत्रकार राजु मिर्झा 
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close