shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कृषीसेनानी डॉ. अण्णासाहेब शिंदे यांना भारतरत्न सन्मान लाभावा- सुखदेव सुकळे


*योग्य पाठपुराव्यासाठी खा.लोखंडेंना निवेदन* 

श्रीरामपूर प्रतिनिधी:
भारतीय कृषिक्षेत्रात कृषिसेनानी स्व.डॉ.अण्णासाहेब पांडुरंग शिंदे यांचे अपूर्व योगदान आहे, भारतीय शेती आणि शेतकरी यांचे देव स्वरूप ठरणारे असे व्यक्तिमत्त्व भूषणावह आहे, त्यांना भारत सरकार तर्फे भारतरत्न सन्मान लाभावा याकरीताचा पाठपुरावा होणेकामी शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांना नम्र निवेदन देताना विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक,सचिव सुखदेव सुकळे म्हणाले.

 याप्रसंगी विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये, आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड, प्रसन्न धुमाळ, संकेत बुरकुले यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close