shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डी.पॉल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महिला दिन उत्साहात साजरा


श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील डी.पॉल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मोठ्या उत्साहात आज महिला दिन साजरा करण्यात आला.


इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर करून सर्व महिला शिक्षकांना शुभेच्छा दिल्या तसेच विविध क्षेत्रातील महिलांच्या वेशभूषा सादर केल्या, यावेळी शाळेचे मॅनेजर फादर थॉमसन यांनी देखील महिलांचे विविध क्षेत्रातील योगदान स्पष्ट करून स्त्रियांनी शिक्षण घेतल्यानंतर कशाप्रकारे प्रगती होते हे सांगितले.
 यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सेलिन,सि.शारोन व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ.सोनाली झांजरी यांनी केले. सौ जयश्री ब्राह्मणे यांनी शुभेच्छापर भाषण केले. सर्व महिला शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन यावेळी सन्मान  करण्यात आला.

*पत्रकार दीपक कदम - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close