shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

भारतीय चित्रपट श्रृष्टीचे जनक दादासाहेब फाळके जयंती निमित्त


*चित्रपट निर्मात्यांच्या न्याय हक्कासाठी अ.भा.मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचा लढा

*न्याय हक्कासाठी आम्ही येतोय, तुम्ही पण या !
मराठी चित्रपट निर्मात्यांचा लढा सक्षम करूया!!

मुंबई प्रतिनिधी:
अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ हे सन २०१९ साली स्थापना करण्यात आले. याचं कारण ही असं की, मराठी चित्रपट निर्मात्याचं कोणीच ऐकून घेण्यास तयार नव्हत व नाही. हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये निर्मात्यांच्या किमान चार पाच संघटना आहेत, साऊथ तर शक्तिमान.परंतु, मराठी चित्रपट निर्मात्यांची परिस्थिती तर फार बिकट,जो निर्माता आपली जमीन, घरदार, सोने - नाणे गहाण ठेवून मराठी चित्रपट निर्मिती करतो. निर्माते यांना चांगल्याप्रकारे माहित असताना की, मराठी चित्रपटास चित्रपटगृहात प्रेक्षकांचा अल्पसा प्रतिसाद आहे. तरी देखील मराठी सांस्कृतिक संस्कृतीवर असणारी निष्ठा, प्रेम, त्याचा मराठी बाणा आणि कणा त्याला आपल्या मातृभाषेचे मराठीपण जपायची ऊर्जा देते. बदल्यात निर्मात्यांना काय मिळते ? अमराठी कार्पोरेट   कंम्पन्याच्या मालकाकडून निर्मात्यांचा पान उतारा होतो तो निमूटपणे सहन करावा लागतो, निर्माता लाखो - कोटी रुपये खर्च करून शेकडो लोकांच युनिट सांभाळतो, एका अर्थाने एका चित्रपटामुळे निर्मिती ते थिएटर रिलीज पर्यंत दोनशे कुटूंबांचा उदरनिर्वाह होत असतो.

पण चित्रपटाची काही दलाल मंडळी एक लाखापासून किंमत  करतात. मराठी चॅनेलसनी तर गेली दोन ते तीन वर्षापासुन चित्रपटाचे हक्क विकत घेणेच थांबिवले आहे. फक्त दलाली घेऊन दलाला मार्फतच एक दोन चित्रपट घेतले जातात. बाकीचे चांगले चित्रपट त्यांना एक ते पाच लाखात म्हणजे फुकटच पाहिजे  असतात. त्यात कहर म्हणजे एकेकाळी चित्रपट रिलीज करण्याकरिता वितरक निर्मात्याला एक ठराविक रक्कम देऊन चित्रपट रिलीज करायचा, आता तोच निर्मात्याकडून पाच लाखाची दलाली घेतो असे का ? ज्या चिटपट गृहात चित्रपट प्रदर्शीत होत होता तो थिएटर मालक स्वत: आजूबाजूच्या परिसरात जाहिरात करत होता. वर्तमानपत्रात आपल्या थिएटर ची जाहिरात देत होता. आता हा सर्व खर्च निर्मात्यांवर टाकला जातो,मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांची मनमानी वाढली आहे हे अन्यायकारक आहे या विषयी निर्माता महामंडळ आक्रमक झाले आहे. निर्मात्यांना त्यांचे हक्क व सन्मान मिळालाच पाहिजे. त्या करिता सरकारने मराठी चित्रपट निर्मात्यांना सरसकट अनुदान देऊन  स्वत:  पासून सुरुवात केली पाहिजे.
मात्र याउलट हजारो कुटूंबाचे उदरनिर्वाह करणाऱ्या मराठी चित्रपट निर्माता यांचे चित्रपट *अनुदानास अपात्र* ठरवली जातात हे किती अन्यायकारक आहे, करोना महामारीमुळे सर्वात जास्त नुकसान निर्माता यांचे झाले आहे त्यामुळे २०२० पासून *अनुदान अपात्र* चित्रपटांना *सरसकट अनुदान* देऊन पुन्हा एकदा चित्रपट निर्मिती करीता प्रोत्साहन द्यावे.तसेच कलाकारांचे हक्क मिळवण्याकरिता महाराष्ट्रातील तमाम मराठी चित्रपट निर्माते, तंत्रज्ञ, कलाकार, कामगार येत्या ३० एप्रिल २०२४ रोजी भारतीय चित्रपट सृष्टींचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जयंती निमित्त हिंदमाता चौक, दादर (पूर्व ) येथील मा . दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्याजवळ सकाळी ९.०० वाजता मोठ्या संख्येने जमणार आहेत आणि ठिय्या आंदोलन करून सरकारला सरसकट अनुदान देण्याकरिता भाग पाडणार आहे. करीता आम्ही येतोय, तुम्ही पण या ! मराठी चित्रपट निर्मात्यांचा लढा सक्षम करूया !! असे अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र मोरे आणी कार्याध्यक्ष बाळासाहेब गोरे तथा सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी, सभासद यांनी आवाहन केले आहे.

*अ.भा.मराठी चित्रपट निर्माता*
 *महामंडळाच्या ठळक मागण्या*
१) करोना महामारीत अडकलेल्या अनुदान अपात्र चित्रपट पात्र ठरवून अनुदान द्यावे.
२) मराठी चित्रपट अनुदान परिक्षण न करता प्रोत्साहन म्हणून पहावे आणि सरसकट अनुदान मिळावे.
३) चित्रपट निर्माता यांना परफॉर्मन्स रॉयल्टी मिळावी.
४) मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांची नियमावली बदलावी.
५) चॅनेल्सने मराठी चित्रपट खरेदी करावे.
६) गाण्यांच्या चॅनेलवर चित्रपट गाणे दाखवणे अनिवार्य करावे.
७) क्युब, युएफओ व इतर डिजिटल चार्जेस आकारणी बदलावी.
या मागण्यांकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधून त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी चित्रपटसृष्टीतील सर्वांनी दादासाहेब फाळके पुतळा, हिंदमाता चौक, दादर पूर्व, मुंबई येथे सकाळी ९ वाजतां उपस्थित राहून आपल्या मराठी चित्रपट निर्मात्यांना पाठबळ द्यावे.

अ.भा.म.चि.नि.महामंडळ- मुंबई

*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close