पैठण प्रतिनिधी:
कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी ता. भुदरगड येथील विद्यासागरचे राज्यस्तरीय उत्कृष्ठ बालसाहित्य पुरस्कार यंदा मराठवाडयाचे प्रसिध्द बाल साहित्यिक अय्युब पठाण लोहगांवकर ता.पैठण जि. छत्रपती संभाजीनगर यांच्या अतिशय दर्जेदार व बाल मनावर सुसंस्कार करणाऱ्या बाल कथा असलेल्या " कष्टाच्या वाटा " या संग्रहाला राज्यस्तरीय बाल साहित्य पुरस्कार अक्षय्यतृतीयाच्या शुभ मुहूर्तावर अध्यक्षा आर. बी. जठार यांनी जाहीर केले आहे. " कष्टाच्या वाटा " या बाल कथासंग्रहात एकूण एकोणावीस वास्तववादी कथा असून ते वाचकांच्या ह्रदयाला जाऊन भिडतात आणि वाचकांना ते कथा आपलेसे वाटतात.
या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि शाल - श्रीफळ असून लवकरच मान्यवरांच्या हस्ते अय्युब पठाण यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे असे अध्यक्षा आर. बी. जठार यांनी पत्राद्वारे अय्युब पठाण यांना कळविले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत सन्मानाचा राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार मराठवाडयाचे बाल साहित्यिक अय्युब पठाण लोहगावकर यांना जाहिर झाल्याबद्दल साहित्य क्षेत्रात त्यांचे अभिनंदन होत आहे.
*पत्रकार हारून शेख - पैठण
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

