shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रेवणनाथ महाराज म्हणजे चिरंजीव ऊर्जा आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज

रेणुका आश्रमात समाधी पूजन
 सोहळा उत्साहात संपन्न 

श्रीरामपूर प्रतिनिधी:
शाक्त पंथ ,नाथ पंथ आणि भक्ती संप्रदाय यांचा त्रिवेणी संगम म्हणजे मौनयोगी रेवणनाथ महाराज होते त्यांचे अलौकिक कार्य म्हणजे आपल्या साठी कधीही न संपणारी चिरंजीव ऊर्जा आहे असे प्रतिपादन आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज यांनी केले.
तालुक्यातील वडाळा महादेव येथील श्रीक्षेत्र रेणुका देवी आश्रमात प्रथम पुण्यतिथी सोहळा निमित्ताने आयोजित किर्तन प्रसंगी ते बोलत होते.

        यावेळी सावरगांव (येवला) येथील बापू गुरूजी कुलकर्णी, मोहनशास्त्री खानविलकर,
अनंतशास्त्री लावर, दत्तोपंत भालेराव महाराज,विश्वंभर महाराज,बहिरट महाराज, शिंदे महाराज, हनुमान भक्त बाळकृष्ण महाराज, सतिश मुळे, साधनाताई मुळे आदी उपस्थित होते.

          यावेळी महाराजांनी संत एकनाथ महाराज यांचा "पुर्व पुण्य असता गाठी,संत भेटी तरी होय, धन्य धन्य संत संग,फिटे पांग जन्माचा" या अभंगावर निरुपम केले.वैदिक आणि वारकरी परंपरा तसेच नाथ परंपरा व विविध संप्रदाय हे कसे व्यापक आहे त्याचे विश्लेषण केले.त्यांना गायनाचार्य किरण महाराज, रावसाहेब महाराज, तुकाराम महाराज, संवादिनी भालेराव महाराज,तर पखवाज परमेश्वर महाराज भारत यांनी व हनुमान भजनी मंडळ यांनी साथसंगत केली.
        प्रारंभी सकाळी राजराजेश्वरी रेणुका देवी महापूजा करण्यात आली. त्यानंतर सद्गुरू चरण पादुका प्रतिष्ठा झाली, यजमान रमेश गावंडे (अमरावती) होते पौरोहित्य सुधीर गुरूजी कुलकर्णी यांनी केले.यावेळी गुरुप्रसाद देशपांडे संपादित"नेवासा दर्शन" चा सद्गुरू विशेषांक प्रकाशित करण्यात आला.महाराष्ट राज्य कबड्डी संघात निवडीबद्दल सौरभ चंद्रशेखर राऊत व "चैतन्य भूषण" पुरस्काराबद्दल ओंकार कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला.सौ.व श्री.अविनाश गणोरकर तसेच डॉ. सौ. वर्षा शिरसाठ यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. सौ. तेजस्विनी पोहेकर व स्नेहल पोहेकर यांनी सद्गुरू कवण सादर केले.महाप्रसादाने पुण्यतिथी महोत्सव सांगता झाली.
            सोहळा यशस्वीतेसाठी सद्गुरू शिष्य परिवाराने परिश्रम घेतले. यावेळी सद्गुरू बाबांचा महाराष्ट्रातील अनुग्रहीत शिष्य परिवार तसेच पंचक्रोशीतील भाविकांची मोठी उपस्थिती होती.

*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close