shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सात गावांच्या पिण्याच्या पाण्यांच्या योजना अवलंबून असलेल्या गोविंदसागर जलाशयात सध्या सुरू असलेल्या आवर्तनातून पाणी सोडण्याची मागणी

श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्याच्या पुर्वभागाला वरदान ठरलेल्या गोविंद सागरने तळ गाठल्याने त्यावर अवलंबून असलेल्या परीसरातील सात गावांच्या पाण्याच्या योजना ठप्प होण्याच्या मार्गावर असल्याने पाटबंधारे खात्याने सध्या सुरू असलेल्या आवर्तनातून टाकळीभान टेलटँक अर्थात गोविंदसागर भरण्याची गरज असल्याने या गोविंदसागर मध्ये पाणी सोडण्याची मागणी परीसरातील शेतकर्‍यांसह नागरीकांकडून केली जात आहे. 

टाकळीभान टेलटँक येथून टाकळीभान, भोकर, खोकर, मातापूर, भेर्डापूर, वांगी व खिर्डी या गावांच्या पाणी पुरवठा योजनांच्या विहीरीतून नळपाणी पुरवठा योजना सुरू आहे. टाकळीभान टेलटँंक अर्थात गोविंद सागर या जलाशयामुळे परीसरातील टाकळीभान, भोकर, खोकर, कारेगाव, मातापूर, गुजरवाडी, वांगी, खिर्डी व कारवाडी आदि गावांच्या परीसरातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेला आहे. त्यावरच या परीसरातील बहुतांशी शेती पिकते. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात या गोविंदसागर मध्ये ओव्हर फ्लोने पाणी सोडण्यात येवून तो भरण्यात आला. अनेक राजकीय नेत्यांनी येथे जलपुजन केले परंतू नेहमी प्रमाणे पाटबंधारे विभागाने काही दिवसानंतर या जलाशयातून टाकळीभान व घोगरगाव परीसरातील शेतीसाठीची दोन आवर्तन सोडली. प्रत्यक्षात पाटबंधारे विभागाने या शेतकर्‍यांना गोविंद सागर मधून आवर्तन सोडून पाणी देण्याऐवजी भंडारदरा धरणातून कालव्याद्वारे येणार्‍या पाण्यातून या शेतकर्‍यांना पाणी देणं आवश्यक होतं. तसे झाले असते तर गोविंदसागरमध्ये आज पुरेसा पाणीसाठा शिल्लक राहीला असता पर्यायाने या परीसरातील अनेक विहीरींचा तळ दिसला नसता लाभधारक शेतकर्‍यांसह वरील सात गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही ऐरणीवर आला नसता.
        प्रत्यक्षात गोविंद सागर भरल्यानंतर येथील पाणी पिण्यासाठी आरक्षीत करण्याची गरज आहे. येथे वितरिका द्वारे शेतकर्‍यांना पाणी देण्याऐवजी संबधीत लाभ धारक शेतकर्‍यांना पाटबंधारे विभागाने भंडारदर्‍याच्या कालव्याच्या आवर्तनातून पाणी देवून गोविंद सागरचा पाणी साठा पिण्यासाठी आरक्षीत करावा अशी मागणी केली जाते परंतू पाटंबधारे विभाग या मागणीकडे नेहमीच दुर्लक्ष करून परीसरावर व पाणीपुरवठा योजना अवलंबून असलेल्या गावांवर अन्याय करत आहे, त्यामुळे केवळ पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षीतपणा व हेकेखोरपणामुळे परीसरातील  शेतकर्‍यांसह लाभधारक पाणी पुरवठा योजनांच्या गावावर अन्याय होत आहे.
              सध्या सर्वत्र पाणी टंचाई आहे, दररोजच्या कडक उन्हामुळे व वार्‍यामुळे परीसरातील विहीरींची पाणी पातळी दररोज खालवत असल्याने परीसरातील शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळू लागले आहे. त्याच बरोबर शासनाचा कोट्यावधीचा निधी खर्चून पिण्याच्या पाण्याच्या योजना असलेल्या टाकळीभान, भोकर, खोकर, मातापूर, भेर्डापूर, वांगी व खिर्डी या गावांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
          ज्या प्रमाणे प्रशासनाने व पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या शेतकर्‍यांचा व नागरीकांच्या पाणी टंचाईचा विचार करून अकोले पासून नेवासा पर्यंतचे केटी वेअर मध्ये पाणी साठवून पावसाचे आगमन उशीराने झाले तरी नदी काठच्या गावांना तीतकीसी पाणी टंचाई भासून नये व आजचा हि प्रश्न सोडविला त्या प्रमाणे या परीसरातील टाकळीभान, भोकर, खोकर, कारेगाव, मातापूर, चारी क्र. 12, वांगी, खिर्डी, गुजरवाडी, कारवाडी आदि गावांना याचा लाभ होईल त्याच बरोबर त्या सात गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल त्यामुळे भंडारदरा धरणाच्या सध्या सुरू असलेल्या आवर्तनातून गोविंदसागर या जलाशयात पाणी सोडण्याची मागणी लाभधारक गावांतील नागरीकांकडून केली जात आहे.

*पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 
9561174111
close