shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत कान्हेगांव शाळेचे ८ विद्यार्थी गुणवत्ता यादीत


श्रीरामपूर प्रतिनिधी:
नुकत्याच झालेल्या मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हेगांवचे ८ विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत येण्याचा मान पटकावला आहे. कान्हेगांव ही श्रीरामपूर तालुक्यातील द्विशिक्षकी शाळा असून दरवर्षी केंद्रस्तरीय तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा असो वा क्रिडा स्पर्धा, विविध स्पर्धा परीक्षा यामध्ये कान्हेगाव शाळेने उल्लेखनीय यश संपादन केलेले आहे. यावर्षी एकाच वेळेस इयत्ता चौथीचे ५ आणि इयत्ता तिसरीचे ३  विद्यार्थी असे एकूण ८ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहे.

इयत्ता चौथीतील अमृता ज्ञानेश्‍वर चौधरी द्वितीय, पूर्वा प्रकाश खरात तृतीय निखिल बाळासाहेब खरात चतुर्थ, ईश्वरी प्रमोद खरात आठवी, विश्वजीत अशोक चौधरी चौदावा क्रमांक. इयत्ता तिसरीतील कुमार अरुण खरात चतुर्थ, साईनाथ विवेकानंद खरात नववा, आराध्या निलेश खरात दहावा क्रमांक गुणवत्ता यादीत मिळवला आहे. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका श्रीमती रेहाना मुजावर शेख तसेच मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली थोरात यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पढेगांव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. राजूभाई इनामदार, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मंगल गायकवाड, श्री.संजीवन दिवे, गटशिक्षणाधिकारी श्रीमती साईलता सामलेटी यांनी अभिनंदन केले आहे. तसेच शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी,पालक,सर्व ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

*पत्रकार सौ.सुनंदाताई शेंडे - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111
close