shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शेती महामंडळ कामगारांना घरकुलासाठी दोन गुंठे जागा मिळावी,पेन्शनवाढ व्हावी यासाठी शिर्डीत मुख्यमंत्री यांना निवेदन

शेती महामंडळ कामगारांना घरकुलासाठी दोन गुंठे जागा मिळावी,पेन्शनवाढ व्हावी यासाठी शिर्डीत मुख्यमंत्री यांना निवेदन

श्रीरामपूर प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगारांना राहण्यासाठी घरकुलसाठी दोन गुंठे जागा मिळावी तसेच इपीएस पेन्शनधारकांना पेन्शनवाढ मिळावी यासाठी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,खा सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले व याबाबत सविस्तर त्यांचेशी चर्चा करण्यात आली.


खंडकरी यांना जमीन वाटप करताना राज्य शासनाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले व त्यामध्ये कामगारांना दोन गुंठे जागा व घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले.२५ वर्षे झाली तरी अद्यापही राज्य शासनाने दोन गुंठे जागा व घरे बांधून देण्याचा निर्णय केला नाही.त्यानंतर २००९ यावर्षी राज्य शासनाने शेती महामंडळ कामगार संघटनांशी चर्चा करून १४३ कोटी थकीत देय रक्कम ठरविली.त्यानंतर तत्कालीन महसूल मंत्री यांनी तडजोड करून कामगारांना २००८ ते २०१२ वर्षापर्यंतचा बोनस,ग्राचुटी,बोनस,४ था, पाचवा वेतन आयोग फरक रक्कम,सहावा वेतन आयोग देण्यासंबंधी कार्यकारी संचालक यांनी राज्य शासनाकडे २०१५ यावर्षी प्रस्ताव पाठविला तो अद्याप मंजूर केला नाही. 
९९ कोटी ५० लाख रु. देण्याचा निर्णय केला.त्याची सुद्धा अंमलबजावणी राज्य सरकारने केली नाही.त्यासाठी नुकताच मार्चमध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी येथे राज्यातील ३००० कामगारांचा मोर्चा नेण्यात आला होता,तसेच महामंडळ कामगारांना १० वर्षापासून पेन्शनवाढ करण्यात आली नाही  तरी पेन्शनवाढ व्हावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना यांनी केली त्यासाठी अनेक आंदोलने केली.आदी विषयाचे निवेदन शिष्टमंडळाने दिले.
शिष्टमंडळात कामगार नेते सुभाष कुलकर्णी,वेनुनाथ बोळींज, चांगदेव गायकवाड,बी.आर. चेडे, प्रकाश ठाकरे,बाबूलाल पठाण, रमेश देसाई,संतोष आहिरे, कारभारी बत्तीशे आदी उपस्थित होते.


ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
close