shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

इंदापूर तालुक्यातील बावीस गावांचा पाणी प्रश्न महायुतीच मार्गी लावू शकते : कृषी मंत्री धनंजय मुंडे लाखेववाडी येथे महायुतीची जंगी सभा : पाणी प्रश्न व रोजगाराच्या प्रश्नांवर हल्लाबोल

इंदापूर तालुक्यातील बावीस गावांचा पाणी प्रश्न महायुतीच मार्गी लावू  शकते : कृषी मंत्री धनंजय मुंडेलाखेववाडी येथे महायुतीची जंगी सभा : पाणी प्रश्न व रोजगाराच्या  प्रश्नांवर हल्लाबोल 

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील २२ दुष्काळी गावांचा पाणी प्रश्न गंभीर आहे. शेतीला पाणी मिळाल्यास, पिढ्यान पिढ्याचं कल्याण होणार आहे. शेतकऱ्यांसाठी एक रुपयांमध्ये पिक विमा योजना आणली. त्यामुळे राज्यातील ९७ लाख शेतकऱ्यांना पिक विम्याचा फायदा झाला. पण आपल्या २२ गावांचा पाणी प्रश्न सोडवायचा असेल तर, त्याला निधी फार मोठा लागणार आहे. यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या त्रिदेवांनी आणि इथले दोन देव हेच महायुतीचे शिलेदार पाण्याचा प्रश्न मार्गी लावून देतील. असा विश्वास राज्याचे कृषी मंत्री, आमदार धनंजय मुंडे यांनी दिला. 

इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथे बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारानिमित्ताने शनिवार ( दि.२७) रोजी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे,  राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हापरिषदेचे माजी सभापती प्रविण माने, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, प्रतापराव पाटील, लाखेवाडीच्या सरपंच चित्रलेखा ढोले,  तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे , शशिकांत तरंगे,भाजपचे मारुती वनवे, भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार, नवनाथ पडळकर, गजानन वाक्षे, माऊली चौरे, प्रसाद पाटील, दत्तात्रय घोगरे, अतुल झगडे, संदेश देवकर,शिवाजी तरंगे, नवनाथ रुपनवर, संग्रामसिंह पाटील, मनोज जगदाळे, महायुतीच्या मित्र पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंत्री धनंजय मुंडे बोलत होते.

पुढे बोलताना मुंडे म्हणाले की, राज्यातील जनतेला, व्यक्तीला किंवा समूहाला जर काम करतो म्हणून शब्द दिला, तर तो शब्द पूर्ण करणारा जर कुठला महाराष्ट्रात  नेता असेल तर, त्यांचे  नाव आहे अजितदादा पवार, ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती चालली आहे. आपल्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी बारामतीमध्ये ६५ एकरामध्ये टेक्स्टाईल पार्क उभे केले. त्यामुळे त्या भागातील १४ हजार महिलांना पोट भरायची संधी मिळाली. आर्थिक उन्नती करायची संधी मिळाली.

मागच्या तीन टर्म खासदार राहिलेल्या ताई, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या नेत्या, जगप्रसिद्ध संसदरत्न यांनी एक तरी आपल्या संकल्पनेतून, आपल्या वडिलांचा आशीर्वाद घेऊन इथल्या हजार मायमाऊल्यांच्या हाताला रोजगार देण्यासाठी, एक प्रकल्प तरी आणला का? हा फरक दोन उमेदवारामधील आपल्याला कळत नाही का?  जर आपल्या सुनेत्राताई अजित पवार या खासदार म्हणून मोदी साहेबांबरोबर देशाच्या सभागृहात खंबीरपणे  उभा राहिल्या तर, २२ गावांचा पाणी प्रश्नच काय, रोजगाराचा देखील प्रश्न मार्गी लागेल.
close