shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उमेदवारांसाठी निवडणूक खर्चाचे लेखे तपासणीचे वेळोपत्रक जाहीर


*उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी होणार ३ मे रोजी

 अहमदनगर जिमाका वृत्तसेवा: 
३७ - अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या निवडणूक खर्च तपासणीसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले असुन ३ मे, ७ मे व ११ मे, २०२४ या दिनांकास उमेदवारांच्या खर्चाची तपासणी करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी ३ मे २०२४ रोजी सकाळी ११- ००  वाजता पंडित जवाहरलाल नेहरु सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आली असुन उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहुन त्यांच्या खर्चाचा हिशोब सादर करावा, असे आवाहन ३७ -अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी  केले आहे.

३७ - अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांचे दैनंदिन खर्च उमेदवार खर्च नोंदवहीत नोंदवणे अपेक्षित आहे.   दैंनदिन खर्चाची नोंदवही संपूर्ण प्रचार कालावधीत किमान तीन वेळा खर्च निरीक्षकांसमोर सादर करणे आवश्यक आहे.
उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी विहित केलेला दिनांकाला खर्चाचे रजिस्टर, मूळ प्रमाणके, अद्यावत बँक पासबुक, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेली सर्व परवानगी पत्रे घेऊन वेळेत उपस्थित रहावे . वेळापत्रकाप्रमाणे उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी यांनी विहित दिनांकास अभिलेख निवडणूक खर्च निरीक्षक यांना उपलब्ध करून न दिल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ प्रमाणे उमेदवाराने प्रतिदिन अभिलेख ठेवले नसल्याचे समजण्यात येऊन त्या प्रकरणी कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.  उमेदवाराचे प्रतिनिधी यांनी खर्च तपासणीच्या वेळी निवडणूक शाखेने त्यांना दिलेले ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक राहील याची नोंद घ्यावी असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close