shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

मुंगी डान्स" या कवितेचे प्रभावीपणे सादरीकरण



पैठण प्रतिनिधी:
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था- पुणे, शाखा - छ्त्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) यांच्या वतीने तालुक्यातील बिडकीन येथील सृजन शैक्षणिक प्रतिष्ठानच्या सहकार्याने आयोजित बिडकीन (ता. पैठण) येथे  "मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनात झालेल्या निमंत्रीतांच्या कवी संमेलनात सुप्रसिध्द बाल साहित्यिक अय्युब पठाण लोहगांवकर यांनी " मुंगी डान्स " ही विनोदी बाल कविता विद्यार्थी- विद्यार्थीनी व साहित्य रसिकांसमोर प्रभावीपणे सादर करून सर्वांना भरपूर हसविले.       " मुंगी डान्स " कवितेने कवी संमेलनात विनोदी वातावरण तयार होऊन कार्यक्रमात रंगत आणली आणि साहित्य रसिकांनी या कवितेचा मनसोक्त आनंद लुटला.

"नाचतांना मुंगी जोराने आपटली
उठतांना तीची लुंगीच निसटली
तशीच मुंगी पळत सुटली
हसत-हसत सारी मंडळी उठली "

या कवि संमेलनाचे अध्यक्ष म्हणून  वैजापूर येथील प्रसिध्द बाल साहित्यिक धोंडीरामसिंह राजपुत हे होते. या कवी संमेलनात  एकूण १० बाल कवींने सहभाग नोंदाविला होता.शिक्षक संदीप भदाने यांनी सुत्रसंचलन करून उपस्थित साहित्य रसिकांचे आभार मानले.

*पत्रकार हारुन के.शेख - पैठण
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close