shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

वांबोरी स्टेशन शाळेच्या इयत्ता ४ थी च्या विद्यार्थ्यांनचा निरोप समारंभ तर १ ली चा प्रवेशोत्सव उत्साहात..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे 
मंगळवार दिनांक २३ एप्रिल २०२४

वांबोरी स्टेशन शाळेच्या इयत्ता ४ थी च्या विद्यार्थ्यांनचा निरोप समारंभ तर १ ली चा प्रवेशोत्सव उत्साहात..!!

राहुरी :   तालुक्यातील आणि वांबोरी पंचक्रोशीतील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या वांबोरी स्टेशन येथील खडांबे खुर्द  शाळेत सालाबाद प्रमाणे इयत्ता ४ थी च्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ व इयत्ता १ ली च्या विद्यार्थ्याचा प्रवेशाचा कार्यक्रम उत्साहात आणि मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरक्षनाथ कल्हापूरे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष तर  किरण हरिश्चंद्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 
          प्रथम सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १ ली च्या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या ९ बालकांचा प्रवेश उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यानंतर चौथीच्या विद्यार्थ्यानी शाळा, शिक्षक व मित्र मंडळ या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रसंगी विद्यार्थी भावुक झाले होते.

शाळेला २ सिलिंग फॅन व घड्याळ भेट
इयत्ता चौथी च्या विद्यार्थ्यानी वर्गणी करून शाळेला २ सिलिंग फॅन व घड्याळ भेट दिले. यातून विद्यार्थांनची सामाजिक बांधिलकी ची भावना दिसून येते. या भेट वस्तूंचा वर्ग शिक्षक  मंगेश करंडे  व मुख्याध्यापक नरवडे  यांनी स्वीकार केला.

       यानंतर वर्गशिक्षक करंडे  मुख्याध्यापक  नरवडे  यांनी आपले मनोगत  व्यक्त केले. कार्यक्रमानंतर उपस्थित विद्यार्थी व पालकांना शाळेच्या वतीने अनलिमिटेड मिसळ पाव ची नाश्ता करिता व्यवस्था ही करण्यात आली होती.

कार्यक्रमास मनोज शेंडकर, ग्रामपंचायत सदस्य अंशबापू (भाऊ) आवारे, काका खळेकर, रावसाहेब सोनवणे, सुरेश खळेकर आदी. पालक उपस्थित होते. 

राजेश भुजबळ यांनी सूत्रसंचालन केले तर श्रमती कचरे आणि ईतर सहशिक्षकांनी  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close