shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आ.लहु कानडे मित्र मंडळाच्यावतीने बेलापूर येथे इफ्तार पार्टी संपन्न


बेलापुर प्रतिनिधी:
रमजानच्या या पवित्र महिन्यात सर्व मुस्लीम बांधव उपवास ठेवुन अल्लाहकडे समाजात शांतता नांदु दे अशी प्रार्थना करतात, त्यांची प्रार्थना नक्कीच कबुल होईल असा विश्वास आमदार लहु कानडे यांनी व्यक्त केला.                             

तालुक्यातील बेलापुर येथील जामा मस्जिद याठिकाणी आ. कानडे परिवार, आ.कानडे मित्र मंडळ व काँग्रेस पक्षाच्या वतीने ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा. नाईक, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, विधानसभा समन्वयक प्रविण काळे, बेलापूर जामा मस्जिदचे चेअरमन जाफरभाई आतार, मौलाना मुर्शिद रजा, प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड, खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड, माजी सरपंच भरत साळूंके, कैलास चायल आदि मान्यवर उपस्थित होते. 
आ. कानडे पुढे म्हणाले की, कडक उन्हाळा असतानाही मुस्लीम बांधव जन कल्याणासाठी उपवास करतात. हिंदु मुस्लीम यांच्यामधील ऐक्य भाईचारा कायम रहावा, जगात शांतता नांदावी, सर्वांना सुख लाभावे, हीच त्यामागील संकल्पना आहे. ती निश्चीतच पुर्ण होईल असेही ते म्हणाले.
यावेळी सचिन गुजर, अरुण पा. नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे आदिंनी मनोगत व्यक्त केले. आ. कानडे यांनी यावेळी मुस्लीम समाजातील रमजान महिन्यातील उपवास केलेल्या लहान मुलांशी संवाद साधत त्यांचे कौतुक केले. 
यावेळी दीपक निंबाळकर, ॲड. मधुकर भोसले, अक्षय नाईक, प्रकाश कुऱ्हे, पत्रकार देविदास देसाई, दिलीप दायमा, चंद्रकांत नाईक, प्रकाश कुमावत, बाळा सावंत, ॲड. अय्याज सय्यद, जब्बार आतार, मुनिर बागवान आदीसह मुस्लीम बांधव उपस्थित होते. मोहसीन सय्यद यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले.

*पत्रकार देवीदास देसाई - बेलापूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close