shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अशोक आयडियल स्कूलचा दहावीचा शंभर टक्के निकाल; श्रेया कसारने पटकावला प्रथम क्रमांक


श्रीरामपूर प्रतिनिधी: 
तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक कारखाना संचलित व माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखालील अशोक आयडियल स्कूलचा दहावी बोर्डाच्या शंभर टक्के निकाल लागला. श्रेया कसार (८७%) हिने प्रथम, निशांत रोहकले (८३.६%) तर दिशा आरोटे (८२.६%) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक  मिळविला.


       अशोक आयडियल स्कूलने शंभर टक्के निकालाची परंपरा यावेळीही कायम राखल्याचे स्कूलच्या संचालिका तथा अशोक कारखान्याच्या संचालिका सौ. मंजुश्रीताई मुरकुटे यांनी सांगीतले. या विद्यार्थ्यांना प्राचार्य रईस शेख, सुनिल बागुल, प्रियंका आहेर, वनमाला गरुड, सायना शेख, वृषाली बकरे, रुपाली देशमुख व सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले.
         यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी आ.भानुदास मुरकुटे, व्हा. चेअरमन पुंजाहरी शिंदे, अॕग्रो इंडस्ट्रीज अँड एजुकेशन फौंडेशनचे अध्यक्ष सोपानराव राऊत, उपाध्यक्ष बाबासाहेब आदिक, सचिव विरेश गलांडे, सहसचिव भास्कर खंडागळे तसेच कारखान्याच्या संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे.
*पत्रकार अफजल मेमन,श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111
close