shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रसार भारतीच्या डीडी उर्दू वर २५ व २६ मे रोजी डॉ.कमर सुरुर यांचे शायरीचे प्रसारण


अहमदनगर प्रतिनिधी:
 अहमदनगर येथील जगविख्यात कवयित्री डॉ.कमर सुरूर यांना प्रसार भारतीच्या डीडी उर्दूच्या" कवी हाजीर है" या कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आले होते. दोन भाग त्यांच्या शेर शायरीचे रेकॉर्ड करण्यात आले. त्यातील पहिल्या भागाचे प्रसारण प्रसार भारतीच्या डीडी उर्दू वर शनिवार दिनांक २५  मे २०२४ रोजी रात्री आठ वाजता प्रसारित होणार असून दुबार प्रसारण रविवार दिनांक २६ मे २०२४  रोजी रात्री आठ वाजता प्रसारित होणार आहे. 


तरी या शेर शायरीचा आनंद गझल रसिकांनी अवश्य घ्यावा असे आवाहन अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे सचिव आबीद दुलेखान यांनी केले आहे.

ज्येष्ठ पत्रकार आबीदखान - अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111
close