रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या परिचारिकांच्या प्रति कृतध्नता व्यक्त करण्यासाठी आधुनिक नर्सिंगच्या जन्मदात्या फ्लोरेंस नाइटिंगेल यांचा जन्मदिन म्हणजेच १२ मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. २०२४ चे घोषवाक्य आहे : "आमच्या परिचारिका - आमचे भविष्य"
१२ मे १८२० रोजी ईटलीच्या फ्लोरेंस येथे विल्ल्यम व फेमी यांच्या पोटी फ्लोरेंस यांचा जन्म झाला.सुखवस्तु कुटुंबात असलेल्या फ्लोरेंस यांच शिक्षण इंग्लैंड येथे झालं. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांना जाणीव झाली की आपला जन्म सेवेसाठी झालेला आहे, रुग्ण,गरीब आणि पीड़ित यांची त्यांना मदत करायची होती. त्यावेळी नर्स पेशाकड़े सन्मानाने पाहिले जात नसे त्यामुळे वडील त्यांच्या विरुद्ध होते.जिद्द कायम ठेऊन १८५१ मधे त्यांनी नर्सिंगच्या शिक्षणाला सुरुवात केली. १८५३ मधे इंग्लैंड येथे महिलाना रुग्णालय सुरु झाले.१८५४ मधे क्रिमियाच युद्ध सुरु झालं त्यावेळी ब्रिटिश सैनिकांना क्रीमिया येथे पाठवलं गेलं. युद्धात सैनिक जख्मी किवा मृत पावल्याच समजताच फ्लोरेन्स अनेक परिचारिकांचे पथक घेऊन तेथे पोहोचल्या. परिस्थिति अतिशय बिकट होती.अस्वछता , दुर्गन्धि, पिण्याचे पाणी नाही.त्यांनी रुग्णांच्या स्वछतेकडे , अंघोळीकडे,अन्नपाणी,ड्रेसिंग याकडे लक्ष पुरविले. सेवेसाठी दिवसरात्र एक केले.रात्रीच्या वेळी हातात कंदील घेऊन रुग्णांची विचारपूस केली. त्यांच्या कुटुम्बियाना पत्र पाठवित. सैनिक प्रेमाने त्यांना लेडी विथ दी लैंप म्हणायचे .
भारतात १७ व्या शतकापर्यन्त परिचारिका शब्दाचा परिचय नव्हता, परिचारिकेला जबाबदारी दिल्यास ती सुद्धा रुग्ण बरा होण्यास चांगले प्रयत्न करु शकते. फक्त योग्य प्रशिक्षणाची गरज आहे. १९५० नंतर नर्सिंगची स्थिति सुधारली. त्यांची विश्वसनीयता , तत्परता , समर्पित सेवा रुग्णांच्या जीवनात आनंद फुलवितात .अनेक लिलयाने सेवा करुन, स्वताचे दुःख विसरुन इतरांचे सांत्वन करतात. नर्सिंग ही नजरेआड़ न करणारी सेवा आहे. समर्पित भावनेने, विनातक्रार सेवेचा वसा चालवणाऱ्या सर्व नर्सेसना मानाचा मुजरा व १२ मे या आंतरराष्ट्रिय परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
*डॉ. रवींद्र कुटे
माजी अध्यक्ष आई एम ए (महाराष्ट्र राज्य)
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

