श्रीरामपूर प्रतिनिधी:
शहरातील सेंट झेवियर्स स्कूल अंतर्गत गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ज्युनियर कॉलेज सुरू करण्यात आले होते.
वाढती विद्यार्थी संख्या पाहता कॉलेज साठी नवीन स्वतंत्र इमारतीची आवश्यकता होती. नव्याने बांधण्यात आलेल्या या सुसज्ज इमारतीचा उद्घाटन सोहळा पुणे येशू संघीय धर्मप्रांताचे प्रांताधिकारी फा. अग्नेलो मस्कारेन्हस यांच्या शुभहस्ते नुकताच संपन्न झाला.
कॉलेजच्या या नवीन इमारतीत केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स व आय.टी. च्या स्वतंत्र अत्याधुनिक लॅब आहेत. पुणे येथील लोयोला हायस्कूलच्या १९८२ च्या माजी विद्यार्थ्यांनी आपले दिवंगत मित्र केनेडी सॅम्युअल यांच्या स्मरणार्थ केमिस्ट्री लॅब दिलेली आहे. सर्व क्लासरूम हे डिजिटल आहेत. ग्रंथसंपदेने संपन्न असणारे ग्रंथालय ही आहे. कार्यक्रमा दरम्यान फा. टायटस यांनी प्रोजेक्टरद्वारे चित्रफित दाखवून नवीन इमारतीच्या बांधकामाविषयी संपुर्ण माहिती दिली. यावेळी प्राचार्य फा. टायटस यांच्या दिशादर्शक कार्याचा लेखाजोखा रवी त्रिभुवन यांनी मांडला.
या उद्घाटना वेळी प्रोव्हेंशियल फा. अग्नेलो मस्कारेन्हस, प्राचार्य फा. टायटस थंगराज, मॅनेजर फा. ज्यो गायकवाड, फा.प्रकाश भालेराव ,पुणे येथून आलेले निमंत्रित पाहुणे आणि शिक्षकवृंद हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक फा. ज्यो गायकवाड यांनी केले. आपल्या ओघवत्या शैलीत आनंद पटेकर यांनी सुत्रसंचालन केले तर हायस्कूल विभागाच्या समन्वयिका अनिता पाठक यांनी आभार मानले.
वृत्तविशेष सहयोग
रवींद्र त्रिभुवन (सर)
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

