*परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य डासांचा प्रादुर्भावही वाढला*
श्रीरामपूर प्रतिनिधी:
सध्या प्रवरा डावा तट कालव्यास पाण्याचे रोटेशन चालु असल्याने या कालव्याचा नॉर्दन ब्रॅंचपासुन निर्माण झालेला उप कालवा हा वॉर्ड क्रं.१ व २ मधून गोंधवणीरोड मार्ग पुढे शिरसगांवकडे व त्यापुढे जातो,मात्र पाण्याचे रोटेशन चालु असल्याने या कालव्यात मोठ्या प्रमाणातील घाण- कचरा हा गोंधवणीरोड स्थित कालव्याच्या छोट्या पुलाखाली आडकल्यानेया कालव्याचे अक्षरशः गटारीत रुपांतर झाल्याचे बघावयास मिळते आहे.
यावर सदरील घाण-कचऱ्यात कदाचित काही मेलेली छोटी जनावरे देखील असल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले असून यामुळे डासांचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे,
संबंधित नगर पालिका घनकचरा विभागाच्या दुर्लक्षामुळेच शहरातील नागरीकांना अशा बिकट समस्यांचा सामना करणे भाग पडत असल्याचे परिसरातील नागरीकांकडून बोलले जात आहे,
घनकचरा विभागाच्या अशा या ढिसाळ कारभारामुळे भविष्यात शहरामध्ये रोगराईची साथ फैलावून नागरीकांना मोठ्या आरोग्य समस्यांचा सामना करणे भाग पडण्याची शक्यता ही नाकारता येवू शकत नसल्याने नगर पालिका मुख्याधिकारी आणी प्रशासक महोदयांनी तात्काळ यावर आपले लक्ष केंद्रित करुन नागरी समस्यांचे निवारण करावे अशी देखील परिसरातील नागरीकांकडून मागणी केली जात आहे.
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर
*समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111

