shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराणा प्रताप मातृभूमीच्या रक्षणासाठी लढणारा महापराक्रमी योद्धा - ससाणे


 श्रीरामपूर/ प्रतिनिधी :-मातृभूमीच्या रक्षणासाठी महाराणा प्रताप यांनी पराक्रमाची शर्त केल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक,माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले. श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित महाराणा प्रताप यांच्या जयंती प्रसंगी ससाणे बोलत होते. 


ससाणे पुढे म्हणाले की, महाराणा प्रताप हे महापराक्रमी योद्धा होते. त्यांच्यावर रोमांच उभे करणारी संकटे, दुःखे कोसळली तरीही त्यांनी स्वधर्म, स्वदेशाभिमान आणि सत्यव्रताचरण कधीच सोडले नाही. यावेळी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, माजी नगरसेवक  दिलीप नागरे, अशोक जगधने, सुरेश ठुबे, डॉ. राजेंद्र लोंढे, रियाज खान पठाण, नवाजभाई जहागीरदार, अमोल शेटे, लक्ष्मण शिंदे, गणेश काते, विशाल साळवे, राजेश जोंधळे, कुंदनसिंग जुनी, सागर दुपाटी, कल्पेश पाटणी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - *9561174111*
close