shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निपाणी वडगाव येथील रोहित्रा जवळील इलेक्ट्रिक उपकरणे तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी


श्रीरामपूर / प्रतिनिधी 
श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील  दलित वस्तीसाठी देण्यात आलेली नवगिरे यांची विद्यूत (वीज) डी पी रोहित्राची कटाऊट वायर आदि इले. साहित्य नादुरुस्त झाले आहेत ते तात्काळ दुरुस्त करावे जेणेकरून असे न झाल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, 

परिसरातील झाडाच्या फांदया विदयुत पुरवठ्यास अडचण निर्माण करतात या संदर्भांत वेळोवेळी संबंधीत विभाग कर्मचारी अधिकारी यांना माहिती दिली आहे परन्तु सदर बाबीकडे दुर्लक्ष होत असताना आढळून आल्याने  येथील श्री भागचंद अभिमान नवगिरे व इतर यांनी रितसर  कार्यकारी  अभियंता महावितरण श्रीरामपुर यांना लेखी निवेदन दिले आहे, तरी यानंतर कुठलीही दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थ निपाणी वडगाव यांच्या कडून देण्यात आला आहे. 
*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - *9561174111*
close