shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
             🌍
  • स्वयं प्रकाश सेवाभावी संस्था झरी बु. च्या वतीने १० वी १२ वीच्या.... "विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप"
  •              🌍
  • लातूर -16 लाख 89 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. 10 व्यक्ती विरुद्ध 09 गुन्हे दाखल. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशांवर लातूर पोलिसांची कारवाई.
  •              🌍
  • गुरुपौर्णिमेनिमित्त रंगला गुरूंचा सन्मान सोहळा
  •              🌍
  • 🌺 गुरुपौर्णिमेनिमित्त भारतीय जनता पक्षाच्यावतीने एरंडोलमध्ये विविध गुरूंचा सत्कार 🌺
  •              🌍
  • तांबवा , कासारी शिवारातून शेतामधील सोलर पॅनल अज्ञाताकडून चोरी..
  • -->

    About Me

    प्रकाश ढोकणे मित्र मंडळाच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..!


    श्रीरामपूर / प्रतिनिधी:
    माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे मित्र मंडळाच्या वतीने येथील सिद्धार्थनगर मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.


    माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे मित्र मंडळाच्यावतीने दर ४ महिन्यानंतर सिद्धार्थ नगर मधील गोरगरीब नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांना गोळ्या,औषधे देखील मोफतच दिले जातात. या आरोग्य तपासणी शिबिरास सेंट आण्णा फॅमिली व फादर हंस स्टाफणर संतूलूक हॉस्पिटल मधील डॉक्टर, सिस्टर यांचे विशेष सहकार्य लाभले, या शिबिरात एकूण १३५ नागरिकांनी सहभाग नोंदवून आरोग्य तपासणी सोबत मोफत गोळया, औषधचा लाभ घेतला. 
    सदरील आरोप शिबीर कार्येक्रम पार पाडण्यासाठी  डॉ. विजय त्रिभुवन, डॉ, मानसी लोंढे, बोर्जेस सर, रिटा सिस्टर, कोळगे सर, अनिता फर्नांडिस, शिबारी संघटनेचे अध्यक्ष संजय सकट, महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषद जिल्हाध्यक्ष दीपक कदम, सोनार संघटनेचे अध्यक्ष मनोज चिंतामणी, तात्यासाहेब सौंदाणे, रामदार ढोकणे, जाकीर कुरेशी, डॉ. महेमूद शेख, अमोलकुमार मिसाळ, विशाल खंडागळे, करण खंदारे, प्रतीक ढोकणे, देवा राजपूत, किरण मिसाळ, आमोल पवार आदींचे विशेष सहकार्य लाभले.
    शेवटी शिबिराचे आयोजक माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे यांनी सर्वांचे आभार मानले.

    पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर
    *सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
    *संकलन
    समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
    close