shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुका विकास आघाडीच्या तब्बल 12 शाखांची गुरुवारी व शनिवारी उद्घाटने उत्साहात!- हर्षवर्धन पाटील हे सन 2024 चे आमदार !- कार्यकर्त्यांचा ठाम निर्धार!

इंदापूर तालुका विकास आघाडीच्या तब्बल 12 शाखांची गुरुवारी व शनिवारी उद्घाटने उत्साहात!
- हर्षवर्धन पाटील हे सन 2024 चे आमदार !
- कार्यकर्त्यांचा ठाम निर्धार!
इंदापूर - प्रतिनिधी दि.11/8/24
                 इंदापूर तालुका विकास आघाडीच्या  12 शाखांची गुरुवारी (दि.8) व शनिवारी (दि.10) या 2 दिवसांमध्ये उत्साहात उद्घाटने करण्यात आली. गुरुवारी (दि.8) पिटकेश्वर, जाधववाडी, सराफवाडी, खोरोची, काळकुटे वस्ती (रेडणी), काळेवस्ती, रेडणी या 7 शाखांची, तर शनिवारी (दि.10) कळंब, जांब, मानकरवाडी, थोरातवाडी, लासुर्णे या 5 शाखांची, अशाप्रकारे प्रकारे या दोन दिवसात एकूण बारा शाखांची  उद्घाटन जोशपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
                   इंदापूर विधानसभा मतदार संघाचे  सन 2024 चे आमदार हर्षवर्धन(भाऊ) पाटील हेच असणार आहेत, असा ठाम निर्धार या सभांमध्ये बोलताना विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. इंदापूरचे स्वाभिमानी, विकासाची दूरदृष्टी लाभलेले, अभ्यासू व संयमी नेतृत्व असणारे हर्षवर्धन पाटील यांना आमदार करण्यासाठी आम्ही जीवाची रान करू, अशी भूमिका या सभांमधून कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
       बावडा गावात विकास आघाडीची पहिली शाखा काढण्यात आली. त्यानंतर मंगळवारी (दि.6) करेवाडी-बनकरवाडी, भावडी, रुई, पळसदेव या 4 शाखांची एकाच दिवशी उत्साही व जोशपूर्ण वातावरणामध्य उद्घाटने करण्यात आली. 
      सध्या इंदापूर तालुक्यात गावागावात विकास आघाडीच्या शाखा काढण्याची स्पर्धा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या 21 ऑगस्ट रोजी असलेल्या वाढदिवसापर्यंत, इंदापूर तालुक्यात विकास आघाडीच्या 100 पेक्षा जास्त शाखा काढण्याचे शिस्तबद्ध नियोजन कार्यकर्त्यांकडून चालु आहे.

close