शिरसाठ हॉस्पिटलमध्ये प्रथमच अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब ; एक तासात रुग्ण बरा - डॉ. दिलीप शिरसाठ
श्रीरामपुर / प्रतिनिधी:
येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ दिलीप शिरसाठ यांचे हॉस्पिटल मधे पॅरालिसिस झालेला रुग्ण अत्याधुनिक उपचार पद्धतीने एका तासात बरा झाल्याची घटना हॉस्पिटल मधे नुकतीच घडल्याची माहिती दवाखान्याचे प्रमुख डॉ. दिलीप शिरसाठ यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना डॉ. दिलीप शिरसाठ यांनी सांगितले की, मुंबईहून ६९ वयाची व्यक्ती कामनिमित्त श्रीरामपूर येथे आले असता त्यांच्या डाव्या बाजूला त्रास सुरु झाला रुग्णाच्या नातेवाईकांनी सदरच्या व्यक्तीला तातडीने डॉ.शिरसाठ हॉस्पिटल मधे आणले तेथे सदर पेशेंट च्या सर्व प्रकारच्या तपासण्या करून एम.आर.आय. केला रिपोर्ट मधे रुग्णाच्या मेंदूत गाठ झालेली दिसत होती ती इंजेक्शनने वितळवली. डॉ. दिलीप शिरसाठ व डॉ. अक्षय शिरसाठ यांनी न्यूरोसर्जन डॉ. नहुष पाटील नाशिक यांच्याशी सल्ला मसलत करून अत्याधुनिक उपचार पद्धतीची माहिती घेतली डॉ. नहुष पाटील तातडीने श्रीरामपूर येथे आले असता डॉ. दिलीप शिरसाठ व डॉ. अक्षय शिरसाठ यांनी चर्चे द्वारे सदरच्या रुग्णावर अत्याधुनिक उपचार पद्धतीचे इंजेक्शन देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार पेशेंट च्या मेंदूच्या गाठेमध्ये इंजेक्शन दिले त्यानंतर एका तासात बेशुद्ध पेशेंट शुद्धीवर येऊन हालचाल करू लागला, बोलू लागला उपस्थित नातेवाईकांबरोबर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला श्रीरामपूर येथील डॉ.शिरसाठ हॉस्पिटल मधे प्रथमच ही उपचार पध्दती यशस्वी पार पडली व पेशेंट सुखरूप मुंबई ला त्याच्या घरी सुखरूप पोहोचले आहे.
पेशेंट च्या नातेवाईकांनी डॉ. दिलीप शिरसाठ व डॉ अक्षय शिरसाठ आणि सर्व स्टाफ चे आभार मानून अभिनंदन केले आहे.
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस
श्रीरामपूर -९५६११७४१११

