shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पावसाचे पाणी मिल्लतनगर सेक्टर ३मधील नागरीकांच्या घरात घुसले..

पालिका प्रशासनाने वेळीच या पाण्याचा बंदोबस्त करावा, अन्यथा २६ ऑगस्ट रोजी नगर पालिकेवर भव्य मोर्चा - जीशान शेख

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
दिनांक २३ ऑगस्ट २०२४ रोजी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पावसाचे पाणी मिल्लतनगर येथील सेक्टर नं.३ मधील नागरिकांच्या घरात घुसल्याने मोठी तारांबळ उडाली आहे.


पावसाचे पाणी सुयोग्य पद्धतीने वाहून जाण्यासाठी 
नगर पालिका प्रशासनाने योग्य नियोजन केले नसल्याने मिल्लतनगर वासियांना नेहमीच पावसाळ्यात अशा समस्यांचा सामना करणे भाग पडत आहे,
आणखी चार दिवस पाऊस होणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज असल्याने संबंधित नगर पालिका प्रशासनाने तात्काळ सदरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने प्राथमिक स्वरुपाची मोहीम हाती घ्यावी आणी मिल्लतनगरवासियांना दिलासा द्यावा अन्यथा त्रस्त मिल्लतनगर वासियांना बरोबर घेऊन दिनांक २६ ऑगस्ट रोजी नगर पालीकेवर मोर्चा नेला जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते जीशान शेख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे.
close