नगर पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरीता सोमवारी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देणार - जीशान शेख
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येथील मिल्लतनगर सेक्टर ३ मध्ये पावसाळ्यात नेहमीच नागरीकांच्या घरात पावसाचे पाणी शिरते,यावेळी देखील तीच परिस्थिती असल्याने मिल्लतनगरवासी पुर्ते वैतागले गेले असुन वारंवार तक्रार करुनही नगर पालिका प्रशासन दखल घेत नसल्याने शेवटी नगर पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते जीशान शेख यांनी सांगितले.
प्रथमतः सोमवार दिनांक २६ ऑगस्ट २०२४ रोजी न.पा. मुख्यधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असून सदरील बाबी ४/५ दिवसात योग्य पावले न उचलले गेल्यास येत्या १ सप्टेंबर २०२४ रोजी नगर पालिकेसमोर शांतीच्या मार्गाने मोर्चे, धरणे आंदोलन, उपोषणे असा मार्ग स्विकारला जाणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते जीशान शेख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

