शिर्डी प्रतिनिधी ; ( संजय महाजन )
सामाजिक बातमी
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस. हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पर्यावरण पूरक रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
वृक्ष पर्यावरणातील महत्त्वपूर्ण घटक आहे. वृक्ष मानवाला उपयुक्त आहेत प्रदूषणापासून आपले संरक्षण करतात या निसर्ग बंधुला राखी बांधून कृतज्ञता व्यक्त करावी व पर्यावरण जागृती व्हावी यासाठी राख्या सुद्धा पाने व फुले यांपासून बनवल्या हा उपक्रम इयत्ता सहावी ड मधील विद्यार्थी विद्यार्थिनींनी विज्ञान विषय शिक्षिका श्रीमती कडू शुभांगी यांच्या मार्गदर्शनाखाली केला.
कार्यक्रमासाठी प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर, पर्यवेक्षक श्री. विजय रसाळ, पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे, ज्येष्ठ लिपिक श्री. कुंडलिक आंबेकर, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती ज्योती डामसे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीमती संजीवनी आंबेकर सर्वांनी वृक्षांना राखी बांधली आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
आगळे वेगळे रक्षाबंधन साजरे करण्यासाठी विज्ञान मंडळ प्रमुख श्री. सुभाष क्षीरसागर आणि विज्ञान अध्यापन करणारे श्री. रवींद्र गोसावी, श्री. देविदास खेडकर, श्री. दत्तात्रय सुरवसे, श्रीमती किरण म्हस्के, श्रीमती मीना परते, श्रीमती प्रीती म्हात्रे, श्रीमती आशा दहिफळे, श्रीमती सर्जेराव मॅडम यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
आगळ्या गण्याळ्या उपक्रमाचे नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी सहकार्यावाह श्री. विजय भुरके, नियामक मंडळ सदस्य तथा शाळासमिती अध्यक्षा श्री. भगवानभाऊ आंबेकर, प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर पर्यवेक्षक श्री. विजय रसाळ, श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे यांनी कौतुक केले.

