shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूरात विद्यार्थ्यांनी धरला ताल सुरावर ठेका एक सूर एक ताल कार्यशाळा उत्साहात संपन्न


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
युवक बिरादरी अहमदनगर जिल्हा शाखा आयोजित स्व. रावसाहेब सीताराम पवार यांचे स्मरणार्थ माजी सरपंच व युवक बिरादरी जिल्हाध्यक्ष कृष्णा पवार यांचे विशेष सहकार्यातून इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांचे वर्धापन दिनानिमित्त येथील मेन रोडवरील आगाशे हॉल मध्ये आयोजित केलेल्या मुंबई येथील एक सूर एक ताल समूह गायन कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी ताल सुरात ठेका धरला व कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.

            कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका खादी ग्रामद्योग चे चेअरमन सुरेश चौधरी यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
           युवक बिरादरी टीमचे प्रमुख अतुल सुंदरकर यांनी आपल्या आवाजाने विद्यार्थ्यांना मोहित केले, त्यांनी सात भाषेतील विविधता असलेले समुह गायन शिकविले, गाणे शिकल्यानंतर ते पुन्हा अक्षय जाधव यांचेकडून दिग्दर्शन द्वारे नृत्याद्वरे शिकविले जात होते. विद्यार्थ्यांनी सदरच्या कार्यशाळेचा खूप आनंद घेवून असे कार्यक्रम नेहमी घेवून नवनवीन गोष्ठी शिकण्यास मिळतात अशी भावना व्यक्त केली. तालुक्यातील शाळांचे प्रतिनिधी कार्यशाळेत सहभागी झाले होते. जवळपास २०० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा सुखद अनुभव घेवुन संयोजकांना धन्यवाद दिले.
विद्यार्थ्यांबरोबर मार्गदर्शक शिक्षकही दिग्दर्शित गीतावर ताल धरून प्रतिसाद देत होते, कार्यशाळेचा समारोप प्रथित यश व्यापारी मुन्ना झंवर व श्रीरामपूर प्रेस चे अध्यक्ष अशोक गाडेकर यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
         तबला वादक कृष्णा रत्नपारखी, सिंथेसायझेर वादक ऋषिकेश दुधाले, आदींनी उत्तम साथ दिली.
        युवक बिरादरी मुंबई संस्थापक पद्मश्री क्रांती भाई शहा,रेड क्रॉस अध्यक्ष तथा प्रांताधिकारी किरण सावंत, उपाध्यक्ष तथा तहसिलदार मिलिंद वाघ आदींच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष कृष्णा पवार,सचिव सुनील साळवे, पोपटराव शेळके, प्रवीण साळवे,सुरेश वाघुले, नानासाहेब मुठे,सचिन चंदन,विनोद हिंगानिकर, अरुण कटारे,साहेबराव रकते, अवधुत कुलकर्णी , पुष्पाताई शिंदे, अनुप्रीती पवार,निर्मला लांडगे आदींनी परिश्रम घेतले.

*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
close