shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूर शहर व तालुका अंधश्रध्दा निर्मूलन समिती कार्यकारिणी जाहीर


अध्यक्ष साहेबराव रक्टे, कार्याध्यक्ष सविता साळुंके, सचिव निर्मला लांडगे, उपाध्यक्ष गणेश थोरात

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूर शहर व तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखेची स्थापना अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर अनाप यांचे प्रमुख उपस्थितीत तर सुनील साळवे  यांचे अध्यक्षतेखाली नूतन कार्यकारिणी करण्यात आली.


अध्यक्ष - साहेबराव रक्टे, कार्याध्यक्ष - श्रीमती सविता साळुंके,प्रधान सचिव- श्रीमती निर्मला लांडगे, उपाध्यक्ष - गणेश थोरात, कायदा, युवा व विवेक वाहिनी विभाग - अमोल सोनवणे, महिला विभाग - श्रीमती शोभा शेंडगे, सोशल मीडिया विभाग - अमोल नलावडे, वार्तापत्र, प्रकाशन व प्रशिक्षण विभाग - सुनील साळवे, विविध उपक्रम विभाग - प्रवीण कुमार साळवे,बुवाबाजी संघर्ष विभाग - पोपटराव शेळके, वैज्ञानिक जाणीव प्रकल्प विभाग - सुभाष बोधक,नूतन पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या १५ पुस्तकांच्या संचाचे लोकार्पण करण्यात आले.

      जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर अनाप यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका आणि कार्यपद्धती याविषयी मार्गदर्शन केले. सुनील साळवे यांनी उपस्थितांचे स्वागत व मनोगत व्यक्त केले. यावेळी श्रीरामपूर शाखेच्या वतीने कार्यकर्ता व शिक्षक प्रशिक्षण वर्ग व सोशल मीडिया विभागाचे प्रशिक्षण घेण्याचे ठरले.
     नूतन कार्यकारणी सदस्यांचे समवेत श्रीरामपूर शहर व ग्रामीण पोलीस निरीक्षक यांना अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करणे विषयीचे निवेदन देण्यात आले तसेच पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर यांचे हस्ते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या १५ पुस्तकांचे लोकार्पण करण्यात आले.
       नूतन शाखा कार्यकारणी सदस्यांचे जिल्हाध्यक्ष अरुण कडू पाटील व कार्याध्यक्ष मधुकर अनाप यांनी अभिनंदन केले आहे.
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस 
श्रीरामपूर -९५६११७४१११
close