वांद्रा मुंबई येथे माधुरी मंदरे यांना साहित्यरत्न प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार प्रदान .
इंदापूर: प्रजासत्ताक अमृत गौरव समिती महाराष्ट्र राज्य आयोजित पुरस्कार २०२४ कवयत्री सौ.माधुरी मंदरे यांना साहित्यरत्न प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार मान्यवरांचे हस्ते मुंबई ,वांद्रा पश्चिम, नॅशनल लायब्ररीच्या अलिशान सभागृहामध्ये २५ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब तोरसेकर,मुंबई पद्मश्री जी.डी.यादव,लेखक,कवी, डाॅ.माळवेकर, भानुदास केसरे, प्रमोद महाडिक, डाॅ. सुकृत खांडेकर, डाॅ.नॅन्सी अल्बुकर्क, राजेश कांबळे, राधाकृष्ण कोळवणकर रेडिओ एंजल्स आदी उपस्थित होते.
माधुरी मंदरे अल्पावधीत साहित्य क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट व उल्लेखनीय उंच भरारीची दखल घेऊन त्यांना *साहित्यरत्न* प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार बहाल करण्यांत आला. तसेच त्यांचा पहिल्या *मधुगंध* या काव्य संग्रहाचे प्रकाशनही करण्यांत आले.
तर हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी हुलावळे सर यांनी परिश्रम घेतले.l

