shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज येथील न्यू रॉयल इंग्लिश स्कूल मध्ये दहीहंडी उत्साहाने साजरी !!

 प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-


केज येथील न्यू रॉयल इंग्लिश स्कूल मध्ये पारंपरिक सण उत्सव मोठया उत्साहात साजरे केले जातात . यामुळे शालेय जीवनात आपली संस्कृती परंपरा यांच्याशी मुले जोडली जातात .व शिक्षण सोबतच आपल्या परंपरा चा आनंद मुलांना घेता येतो. वेगवेगळ्या उत्सव मुळे मुलांना आनांदमय वातावरणात शिक्षण देखील आनंद मय होऊन जाते .





कृष्ण जन्म अष्टमी निमित्ताने मंगळवारी न्यू रॉयल इंग्लिश स्कूल मध्ये बाळ गोपाळानी दहीहंडी चे आयोजन केले होते. यावेळी मुलांनी कृष्ण व मुलींनी राधा ची वेशभूषा केली होती. लहान मुलामुलींनी आपल्या सुंदर वेशभूषा नी शाळेतील वातावरण भारावून गेले होते. शाळेत बांधलेल्या दहीहंडी ला फोडून गोपाळकाला चा आनंद लुटला .यावेळी मुख्यध्यापिका  विजया जोगदंड गायकवाड , शिक्षिका स्वाती साबळे फुके  , निकिता नवघरे रोडे व दत्ता बावरे सह बालगोपाल उपस्थित होते.
close