shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुका बार असोसिएशन संघटना नूतन पदाधिकाऱ्यांचा सोनाई परिवाराच्या वतीने सत्कार...

इंदापूर तालुका बार असोसिएशन संघटना नूतन पदाधिकाऱ्यांचा सोनाई परिवाराच्या वतीने सत्कार...
इंदापूर :
इंदापूर तालुका बार असोसिएशन संघटना २०२४-२५ ची नूतन कार्यकारणी जाहीर झाली असून या कार्यकारिणीचा सोनाई पॅलेस येथे सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथदादा माने व पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती प्रवीण यांनी सन्मान केला.  

यावेळी अध्यक्षपदी निवड झालेले ॲड. गिरीश शहा, उपाध्यक्ष ॲड. भारत कडाळे साहेब व ॲड. शरद घोगरे, सचिव ॲड. योगेश देवकर साहेब, खजिनदार ॲड. सोमनाथ फुलसुंदर , ग्रंथपाल ॲड.भालचंद्र कुलकर्णी, महिला प्रतिनिधी ॲड. तेजस्वी वीर, सदस्य ॲड. आप्पासाहेब शिंदे यांच्यासह पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट उपाध्यक्षपदी निवड झालेले ॲड. माधवराव शितोळे देशमुख, वनसंरक्षक पुरस्कार विजेते ॲड. सचिन राऊत यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट तालुका अध्यक्ष ॲड. तेजसिंह आप्पा पाटील, कार्यध्यक्ष महारुद्र पाटील, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य अमोलशेठ भिसे, पुणे जिल्हा सामाजिक न्याय अध्यक्ष सागर बाबा मिसाळ, ज्येष्ठ ॲड. कृष्णाजी यादव, ॲड. मनोहर नाना चौधरी व इंदापूर बार असोसिएशनचे अन्य सदस्य उपस्थित होते
close