शिर्डी प्रतिनिधी: ( संजय महाजन)
सामाजिक बातमी
आज श्री साईनाथ औद्योगिक सोसायटी, शिर्डी यांचे वतीने मा.श्री राजेंद्र भाऊसाहेब गोंदकर (मा. भाजपा जिल्हाध्यक्ष )यांनी श्री साई संस्थान एम्प्लाईज क्रेडिट को-ऑफ. सोसायटी लि. शिर्डी येथे सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी सत्कार करतांना संस्थेचे चेअरमन विठ्ठलराव पवार व व्हा.चेअरमन पोपटराव कोते, संचालक राम गागरे ,मिलिंद दुनबळे, रवी गायकवाड सभासद शंकर आरणे व सचिव नबाजी डांगे उपस्थित होते.
तसेच यावेळी श्री साईनाथ औद्योगिक सोसायटीच्या वतीने निवेदन देताना व्हा.चेअरमन सोमनाथ काजळे, संचालक ,राजेश शर्मा, अशोक पवार, किरण बोराडे उपस्थित होते.

