shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वातंत्र्य दिनाच्या पुर्व संध्येला वडापुरी प्राथमिक शाळेत ५१ झाडांचे वृक्षारोपण.वृक्ष संजीवनी परिवार इंदापूर व जि प . प्राथ शाळा वडापूरी यांचे संयुक्त विद्यमाने केले वृक्षारोपण.

स्वातंत्र्य दिनाच्या पुर्व संध्येला वडापुरी प्राथमिक शाळेत ५१ झाडांचे वृक्षारोपण.

वृक्ष संजीवनी परिवार इंदापूर व जि प . प्राथ शाळा वडापूरी यांचे संयुक्त विद्यमाने केले वृक्षारोपण. 
इंदापूर: दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी  जि प . प्राथमिक शाळा वडापूरी( ता . इंदापूर जि . पुणे ).
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पुर्व संध्येला वडापुरी येथील शाळेच्या आवारात वृक्ष संजीवनी परिवार इंदापूर व जि प . प्राथ शाळा वडापूरी यांचे संयुक्त विद्यमाने शाळेच्या आवारात ५१ झाडांचे वृक्षारोपण शाळेतील मुले ,मुली आणि वृक्ष संजीवनी परिवाराच्या सायरा आत्तार , माधूरी मंदरे व शिक्षक वर्ग यांचे हस्ते करण्यात आले .

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा सुहास मोरे, शामसुंदर हरिदास माने ,प्रतिभा प्रकाश गर्कळ , संगीता गणेश नकाते व वृक्ष संजीवनी परिवाराचे चंद्रकांत देवकर नाना , अशोक अनपट व हमीदभाई आत्तार उपस्थित होते .
close