प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-
सन- २०२३ खरीप अनुदानासाठी ई-पिक पाहणी पोर्टल द्वारे पिकांची नोंदणी करण्याची अट रद्द करून सरसगट शेतकऱ्याना प्रती हेक्टर ५००० रुपयांची मदत करण्यात यावी अशी मागणी आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे साहेब यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व कृषीमंत्री ना. धनंजय मुंडे साहेब यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,
खरीप हंगाम सन- २०२३ मध्ये बुतांश भागात कमी पाऊस झाल्याने तसेच सोयाबीन व कापसाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते, त्यानुषंगाने झालेल्या नुकसानीसाठी शासनाने शेतकऱ्याना प्रती हेक्टर ५००० रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परंतु सदर निर्णयात शासनाने ई-पिक पाहणी पोर्टल द्वारे पिकांची नोंदणी केलेले शेतकरी सदर अनुदानास पात्र रहाणार असल्याची जाचक आट घातल्याने बीड जिल्ह्यासह केज विधानसभा मतदार संघातील मोठ्याप्रमाणात शेतकरी सदर अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बीड जिल्ह्यासह माझ्या केज मतदार संघात मोठ्याप्रमाणात डोंगराळ भाग आहे. सदर ठिकाणी नेटवर्क नसल्याने तसेच पोर्टलचे सतत सर्वर डाऊन असल्याने जवळपास ३०% ते ४०% शेतकऱ्यांची ई- पिक पाहणी झालेली नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी केलेली आहे त्यामधील १०% शेतकरी यांची नावे अनुदानाच्या यादीत समाविष्ट झालेली नसल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे केज विधानसभा मतदार संघासह बीड जिल्ह्यातील मोठ्याप्रमाणात शेतकरी सदर अनुदानापासून वंचित राहणार असल्याने शेतकऱ्यांमधून प्रचंड प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे केज विधानसभा मतदार संघासह बीड जिल्ह्यातील वरील परिस्थिती पाहता ई-पिक पाहणी पोर्टल द्वारे पिकांची नोंदणी करण्याची अट रह करून सरसगट शेतकऱ्याना प्रती हेक्टर ५००० रुपयांची मदत देणे अत्यंत गरजेचे आहे, तरी केज विधानसभा मतदार संघासह बीड जिल्ह्यातील वरील परिस्थिती पाहता खरीप हंगाम सन- २०२३ अनुदानासाठी ई-पिक पाहणी पोर्टल द्वारे पिकांची नोंदणी करण्याची अट रह करून सरसगट शेतकऱ्याना प्रती हेक्टर ५००० रुपयांची मदत देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केली आहे.