shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवी झेप नवी आव्हाने घेवून बदलाचे साक्षीदार व्हा ! डॉ. अंजलीताई घाडगे उतरणार विधान सभेच्या रणसंग्रामात !

प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी :-

नवी आव्हाने पेलून केज विधान सभेच्या रणसंग्रामात डॉ अंजली ताई घाडगे या उतरणार असल्याचे संकेत मतदारांना लागले असून मतदार संघाचा निःस्वार्थीपणे विकास करण्याची त्यांची क्षमता आता लपून राहिली नाही. त्यामुळे एका उच्च विद्याभूषित कुटुंबातील आणि समाजकारण व राजकारणात अग्रगण्य असलेल्या डॉ. अंजली ताई घाडगे यांनी निवडणूक लढविण्याची मागणी होत आहे. 



केज विधान सभेसाठी अनेकजण इच्छुक आहेत. मात्र एक उच्च शिक्षित चेहरा आणि या मतदार संघातील औद्योगिक वसाहत, केजचा एसटी डेपो, काळवटी तलाव, मांजरा प्रकल्प व लिफ्ट इरिगेश यासह विकासाची गंगा सामान्यांच्या दारा पर्यंत ज्या आणू शकतील; ज्यांच्यात या मतदार संघातील सामान्यांचे प्रश्न सोडविण्याची धमक असलेले नेतृत्व म्हणून डॉ. अंजलीताई घाडगे यांचे सक्षम नेतृत्व असल्याचा विश्वास केज-अंबजोगाई सामान्य जनतेला आलेला आहे. 

डॉ. अंजलीताई घाडगे या समाजसेवा आणि दु:खीतांचे अश्रू पुसण्यासाठी काळवेळ यांचे भान न ठेवता सदैव तत्पर असतात. म्हणून आता डॉ. अंजलीताई घाडगे यांनी झेप घेवून नवी आव्हाने पेलण्यासाठी सज्ज होवून मतदार संघाचा चेहरा बदलण्यासाठी बदलाचे साक्षीदार व्हायलाच हवे !

close