shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नाताळ सणानिमित्त दत्तनगर बेथेल चर्च येथे पवित्र येशू नाम सप्ताह चे आयोजन


श्रीरामपूर / प्रतिनिधी:
दत्तनगर येथील बेथेल चर्च, मिनिस्ट्री ट्रस्ट आयोजित २६ डिसेंबर २०२४  ते १ जानेवारी २०२५ दरम्यान पवित्र येशू नाम सप्ताह साजरा होत आहे. नाताळातील सप्ताहाचे हे १३ वे वर्ष आहे.सप्ताहाच्या प्रत्येक दिवशी सकाळी ७ वाजता विविध प्रार्थना, सकाळी १० वाजता गायन वादन ,स्तोत्र वाचन, परमेश्वराची आराधना , उपासना,संदेश प्रवचन , सायंकाळी ७ वाजता १५० स्तोत्र संहिता ,आनंद महोत्सव, नाटिका,आत्मिक परीक्षण, ख्रिस्त जन्मोत्सव अभ्यासमाला,भक्तिसंध्या , पवित्र सहभागिता कार्यक्रम बेथेल चर्च प्रमुख रेव्ह पास्टर सतिष आल्हाट यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

      सप्ताहात ब्र.विकी सोनी (ठाणे), पास्टर दिपक थोरात (अहिल्यानगर) पास्टर सज्जी टी. एम. (कोल्हार), पास्टर शैलेश अमोलीक,(बेलापूर) ,पास्टर राजेश प्रभुणे (कणगर) यांचे प्रवचन संदेश होतील.प्रमुख उपस्थिती ऑल पास्टर फेलोशिप श्रीरामपूर यांची आहे.सप्ताहामध्ये सिस्टर नलिनी, सिस्टर सिमा,  बेथेल महिला मंडळ , दत्तनगर,टिळकनगर, रांजणखोल,वडाळा महादेव, उंदीरगाव , एकरुखे,बेलापूर खुर्द,लोणी लाडगांव चे सेवक प्रतिनिधी , बाल आनंद संस्कार केंद्रातील कुमार जैतुन, कुमारी शेरॉन इतर सर्व मुले मुली सप्ताहात सेवा सहकार्य देत आहेत. याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे सप्ताह कमिटीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर 
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
close