shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महिला सुरक्षा काळाची गरज**या नाटिकेचा प्रथम क्रमांक


संगमनेर / प्रतिनिधी:
 तालुक्यातील वडगावपान बीटस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा नुकत्याच मनोली येथे पार पडल्या,या स्पर्धेत वडगावपान, जोर्वे, आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द,पिंपरी लौकी आजमपूर या केंद्राचा समावेश होता.

सदर स्पर्धेत सांस्कृतिक गटात  "महिला सुरक्षा काळाची गरज" वडगावपान शाळेच्या नाटिकेचा बालगटात प्रथम क्रमांक आला. तालुका स्पर्धेसाठी नाटिकेची निवड झाली आहे. याबद्दल संगमनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड, शिक्षण विस्तार अधिकारी दिपक त्रिभुवन, केंद्रप्रमुख आशा घुले तसेच सरपंच , उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ व शि.वि. अधिकारी श्रीम.कलगुंडे मॅडम व विषयतज्ज्ञ योगेश मोरे यांनी जि.प.प्राथ.केंद्र शाळा वडगावपान शाळेतील नाटिकेतील सहभागी विद्यार्थ्यांचे , मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करत  अभिनंदन केले आहे.

*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार लियाकतखान पठाण - संगमनेर 
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
close