shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कळस येथील वारकरी संप्रदयातील ह.भ.प. रोहिणीताई गडकरी यांना महाराष्ट्र राज्य रामोशी बेरड समाजाच्या वतीने समाजभूषण पुरस्कार जाहीर....!


       रामोशी समाजातील पहिल्या महिला कीर्तनकार व प्रवचनकार म्हणून ह.भ.प. रोहिणीताई गडकरी यांनी काम सुरु केले आहे. समाजात प्रबोधनकार म्हणून त्यांचं कार्य असल्याने समाजाच्या वतीने पुणे येथे गौरव करण्यात आला.

        त्यांच्या या पुरस्काराबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कळस गावच्या वतीने सरपंच राजेंद्र गवांदे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी  ह.भ.प. गणेश महाराज वाकचौरे, जयकिसान दूध संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष नामदेव निसाळ, अगस्ती साखर कारखान्या चे संचालक सिताराम वाकचौरे, संगमनेर साखर कारखान्या चे संचालक संभाजी वाकचौरे, डी टी वाकचौरे, भरत वाकचौरे आदी उपस्थित होते. 
       ह.भ.प. रोहिणी गडकरी बोलताना म्हणाल्या की, समाजाच्या वतीने दिलेल्या पुरस्कारा पेक्षा गावच्या मातीचा सन्मान मला लाख मोला वाटतो. अध्यात्मिक अभ्यासाने जीवनात समाधान लाभते. वारसा नसताना देवाच्या आशीर्वादने धर्माचे कार्य होत आहे. असेही मत व्यक्त केले.
close