shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संत गाडगे महाराज आधुनिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक - आ. ओगले


 श्रीरामपूर / प्रतिनिधी:
 संत गाडगे महाराज हे आधुनिक दृष्टिकोन असलेले थोर समाज सुधारक होते असे प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांनी केले. श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी ओगले बोलत होते. 

ओगले पुढे म्हणाले की, संत गाडगे महाराजांनी दिन दलित आणि पिडीतांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतित  केले. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकप्रबोधन करून समाजातील दांभिकपणा, अनिष्ट रूढी परंपरा यावर प्रखर टीका केली. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता व चारित्र्य यांची शिकवण दिली. संत गाडगे महाराज हे गोरगरीब, दिन दलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने  कार्य करणारे महान समाज सुधारक होते.
 या प्रसंगी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
 यावेळी जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, जि.प. चे माजी सभापती बाबासाहेब दिघे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, पंडितराव बोंबले,माजी नगरसेवक शंकरराव गायकवाड, कलीम कुरेशी, मनोज लबडे, विलास लबडे, मिथुन शेळके,अशोक जगधने, डॉ. राजेंद्र लोंढे, सुरेश ठुबे, सुनील साबळे, नवाज भाई जहागीरदार, भैया भाई अत्तार, रज्जाक पठाण, जाकीर सय्यद, सनी मंडलिक, पुंडलिक खरे, बाबा वायदंडे, जाफर शहा, भगवान जाधव, अतिश देसरडा, गणेश काते, सुरेश बनसोडे, राजेश जोंधळे, सुरेश कांगुणे, योगेश बडधे, प्रताप गुजर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
close