shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोइंजे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपन्न

भोइंजे:-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोइंजे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त इयत्ता पहिली ते सातवी च्या विध्यार्थ्यांनं मध्ये विविध स्पर्धाचे आयोजन व बक्षीस वितरण  विवेक बहुउधेशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय गुरव यांच्या तर्फे शाळेमध्ये घेण्यात आल्या विद्यार्थ्यांमध्ये संगीत खुर्ची लिंबू चमचा  निबंध स्पर्धा चित्रकला सुंदर हस्ताक्षर पोत्यातील उडी अशा भरपूर स्पर्धा घेण्यात आल्या सर्व मुलांनी आनंदाने सहभाग घेऊन उत्तीर्ण झाले या स्पर्धामध्ये मध्ये पहिला नंबर दुसरा नंबर तिसरा नंबर असे क्रमांक काढण्यात आले.



     बक्षीस वितरण गावचे पोलीस पाटील ललिता मुसळे यांच्या हस्ते  तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक सचिन दत्तात्रय देशमुख , हरिश्चंद्र केरबा थोरात, विजयसिंह गटकळ, दीपक  डोईफोडे,   शिवाजी घाडगे.यांच्या मार्फत बक्षीस वितरण करण्यात आले शाळेमध्ये शिकत असल्याल्या विध्यार्थ्यांना सर्व कला प्राप्त करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक प्रमिक पणे कार्य करत असल्याचे गावचे पोलीस पाटील ललिता मुसळे यांनी मुख्याध्यापक सचिन दत्तात्रय देशमुख यांचे आभार मानून त्यांचा पुष्प गुच्छ देऊन सन्मान केला तसेच सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गुरव हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी जे विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये होणाऱ्या फायद्यासाठी हे करत असलेले सामाजिक कार्याचे गावचे पोलीस पाटील ललिता मुसळे यांनी दत्तात्रय गुरव यांचे अभिनंदन करून त्यांचा सामाजिक कार्य  करत असलेल्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दीपक डोईफोडे सर यांनी केले दत्तात्रय गुरव यांच्या सामाजिक कार्याचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोइंजे या शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन दत्तात्रय देशमुख यांनी दत्तात्रय गुरव यांचे आभार म्हणून सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले पोलीस पाटील व दत्तात्रय गुरव यांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले
close