इंदापूर : पळसदेव-(ता. इंदापूर) येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी.बनसुडे विद्यालयामध्ये मराठी भाषा दिन चैतन्यपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या खास दिवशी मराठी भाषेचे महत्व विद्यार्थ्यांमध्ये जागृत करण्यासाठी व भाषेचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले असे प्राचार्या वंदना बनसुडे यांनी सांगितले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणारे संस्थेचे संस्थापक आदरणीय हनुमंत बनसुडे यांनी वाचनाचे व मराठी भाषेचे महत्त्व सांगत मार्गदर्शन केले. भाषा दिनाच्या गौरवा निमित्ताने विद्यार्थ्यांनी भाषण, कविता, मराठी गीत, व मराठी विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा मानसन्मान आदी उपक्रम सादर केले. आजच्या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक राहुल वायसे, सदस्य आप्पासाहेब मोरे, पालक वर्गातून सागर बनसुडे,समन्वयक सुवर्णा वाघमोडे, विभाग प्रमुख तेजस्विनी तनपुरे, ज्योती मारकड तसेच शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या पोटे यांनी केले व आभार प्रदर्शन सारिका चितळकर यांनी केले.
**

