shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पत्रकार उद्धव फंगाळ यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार जाहीर

मेहकर मध्ये भव्य राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन 

पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे तथागत ग्रुप संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांचे आवाहन 

मेहकर / प्रतिनिधी:
मेहकर शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार उद्धव श्रीराम फंगाळ यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार २०२५ जाहीर झाला असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.


श्री.फंगाळ यांनी गत ३०-३५ वर्षांहून अधिक काळ विविध प्रसार माध्यमांद्वारे आपल्या निरपेक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे,तसेच आपल्या स्वतः च्या (दैनिक विदर्भ सत्यजित,दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आणी सांयदैनिक साईसंध्या (बुलढाणा आवृत्ती) चे मुख्य संपादक) प्रसार माध्यमांद्वारे ते आजही सेवारत आहेत, त्यांच्या अशा या निर्पेक्ष आणी परोपकारी समाजसेवेची दखल घेवून त्यांना सदरील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

       सदरील पुरस्कार हा मेहकर येथील तथागत बहुउद्देशीय संस्था, मेहकर द्वारे आयोजित राजमाता माँ जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट,जीवन दिप अनाथ आश्रम व वृध्दाश्रम तसेच तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कर्तृत्ववान बंधू व भगिनींना, तसेच युवक युवतींचा नॅशनल पिपल लीडरशीप ॲवॉर्ड, राजमाता माँ. जिजाऊ गौरव सन्मान पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई यांनी दिली.
      सदरील भव्य पुरस्कार वितरण सोहळा हा रविवार दि.०९ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता मेहकर येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका अशोका भवन याठिकाणी आयोजीत करण्यात आला आहे. या सोहळ्यात मान्यवरांना  नॅशनल पिपल लीडरशीप अवॉर्ड, राजमाता माँ. जिजाऊ गौरव सन्मान, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार देण्यात येवून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.तसेच याप्रसंगी माजी सैनिक सन्मान आणी नागरी सत्कार समारंभाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणाऱ्या बंधू व भगिनींना, तसेच युवक युवतींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
 नॅशनल पिपल लीडरशीप ॲवॉर्ड, राजमाता माँ. जिजाऊ गौरव सन्मान पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्काराचे गावपातळीवर मेहकर येथे वितरण होणार आहे. यामध्ये सन्मानपत्र, सन्मानचिन्ह ट्राफी, मेडल,  पंचरंगीदुपट्टा असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असलेल्या गुणीजणांना पुरस्कार वितरण व ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्वानी या आनंदमोह उत्सवानिमित्त उपस्थित रहावे असे आव्हानही तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांच्या वतीने करण्यात आले आहे.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर - 9561174111
close