शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याऱ्या* क्रांतीसूर्याला एल.जी. बनसुडे *विद्यालयात विनम्र अभिवादन
इंदापूर : पळसदेव (ता-इंदापूर) येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी. बनसुडे विद्यालयात स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 198 वी जयंती विद्यालयात उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेच्या प्राचार्या वंदना बनसुडे यांनी ज्योतिबा फुले यांचे'जीवन चरित्र व शैक्षणिक कार्य'आपल्या प्रास्तविकेतून सादर केले. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय हनुमंत बनसुडे यांनी आपल्या आयुष्यात रोज नवीन कल्पना येतात पण खरी धडपड ती प्रत्यक्षात आणण्यात असते असे अमृततुल्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. इयत्ता १ली ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाषण, कविता व नाटिका आदी उपक्रमाच्या माध्यमातून ज्योतिबा फुले यांचे विचार व्यक्त करत त्यांना अभिवादन केले.सहशिक्षिका तनुजा फुगे यांनी महात्मा फुले यांचे प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. आजच्या कार्यक्रमासाठी सचिव नितीन बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे, समन्वयक सुवर्णा वाघमोडे, विभाग प्रमुख प्रवीण मदने, तेजस्विनी तनपुरे, सीमा बाराते यांची उपस्थितीती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती मारकड यांनी केले. शिक्षण ही स्त्री-पुरुषांची प्राथमिक गरज आहे असे विचार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या प्रयत्नाने कार्यक्रम यशस्वी झाला.

