shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अपात्र ३०५ गोशाळांची त्रुटी पुर्ण करुन योजनेचा लाभ द्या अन्यथा अमरण उपोषणाचा इशारा

 

सेनगांव/विश्वनाथ देशमुख

गोसेवा आयोगामार्फत पालनपोषणासाठी देण्यात येणार्या अनुदान योजनेत अपात्र ३०५ गोशाळांची त्रुटी पुर्ण करुन पात्र यादी घोषीत करुन योजनेचा लाभ द्यावा अन्यथा हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येईल या मागणीचे निवेदन महाराष्ट्र  राज्य लोकशाही नोंदणीकृत गोशाळा चालक संघाकडुन दि.२८ मार्च शुक्रवार रोजी हिंगोली जिल्हाधिकाऱ्याकडे देण्यात आले आहे.


संपुर्ण महाराष्ट्र राज्यात गोसेवा आयोगामार्फत देशी गायीच्या पालन पोषणासाठी प्रती दिन ५० रुपये अनुदान देण्या संदर्भात शासनाने घोषीत केले होते.कागदपत्रांच्या पडताळणीअंती ५६१ गोशाळांची यादी पालन पोषणाचा खर्च देण्या संदर्भात प्रसिध्द करण्यात आले परंतु काही त्रुटीमुळे ३०५ गोशाळा अपात्र ठरविण्यात आल्या तरी शासनाने अपात्र गोशाळांची त्रुटीची पुर्तता करुन सदर ३०५ गोशाळांना पात्र घोषीत करण्यात याव्या जेणेकरुन गोरक्षण,गोसंवर्धन कार्यास अधिक बळकटी मिळेल व सदर गोशाळांवर अन्याय होणार नाही.

शेती उपयोगीसाठी रात्रंदिवस कामात येणाऱ्या बैलांची संख्या दिवसेदिवस दुर्लभ झाली आहे तरी शासनाने पालन पोषण योजनेत वळु अथवा बैलांचा समावेश करावा जेणेकरून देशी गोवंशाची बैलांची संख्या अबाधीत राहील. तरी शासनाने तात्काळ अपात्र ३०५ नोंदणीकृत गोशाळांना पालन पोषण खर्च त्रुटी पुर्ण करुन अनुदान देण्यात यावे तसेच वळु व देशी बैलांना पालन पोषण योजनेत समावेश करण्यात यावे ही मागणी तात्काळ मान्य न झाल्यास महाराष्ट्रात जिल्हा निहाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोशाळा चालक संघातर्फे आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला.यावेळी राज्य लोकशाही नोंदणीकृत गोशाळा चालक संघाचे राज्य संघटक छत्रपती पोले,जिल्हाध्यक्ष रामप्रसाद देवकर,सुधाकर देवकर,अनिल देवकर व हिंगोली जिल्ह्यातील गोशाळा चालक उपस्थित होते.
close